सावंतवाडी : तालुक्यातील डिंगणे गावात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने “सेवा पंधरवडा – आरोग्य आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत डिजिटल फिरता दवाखाना आयोजित करण्यात आला आहे.
हा उपक्रम उद्या बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी डिंगणे ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडणार असून गावातील नागरिकांना त्यांच्या दारी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळणार आहे. या दवाखान्यात 100 पेक्षा जास्त तपासण्या करण्यात येणार असून, अनेक तपासण्यांचे रिपोर्ट केवळ 5 ते 10 मिनिटांत उपलब्ध होतील.
उपक्रमात होणाऱ्या प्रमुख तपासण्या:
संपूर्ण शरीरिक तपासणी
हेमोग्लोबिन
शुगर लेव्हल
कोलेस्टेरॉल
रक्तदाब
हृदय तपासणी (ECG)
युरिन टेस्ट
वजन, उंची, बॉडी मास
प्राणवायू लेव्हल
या आरोग्य तपासणी शिबिरासाठी संपर्क व्यक्ती म्हणून श्री. स्वागत नाटेकर (9422393409), श्री. गुरुदत्त कल्याणकर (9860687441) आणि श्री. जयेश कृष्णा सावंत (9421246648) यांच्याशी संपर्क करावा.
या उपक्रमामागे भाजपचे महाराष्ट्र युवा नेते विशाल प्रभाकर परब यांची संकल्पना असून, “रुग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा” या भावनेतून हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.


