सावंतवाडी : शहरातील जुना बाजार येथे राहत्या घरी एका पुरुषाने आत्महत्या केली असून राजेश शिवाजी पांगम (वय ४७) असं त्यांचे नाव आहे. आज सायंकाळी राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील सोपस्कार पार पाडले.
जुना बाजार येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पंचनामा करून शव रूग्णालयात आणण्यात आला. यावेळी जुना बाजार येथील माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, नंदू गावडे, गणेश मिशाळ, सत्यवान बांदेकर, रवी जाधव, परेश बांदेकर, हेमंत रंकाळे यांनी रूग्णालयात धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, अनिल धुरी, मयुर निवडेकर यांनी या आत्महत्येचा पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांची शहरात गणेश मुर्तीशाळा होती.


