Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

ना. दीपक केसरकर मित्र मंडळाचे ‘गुरुसेवा सन्मान पुरस्कार -२०२४’ जाहीर, ‘हे’ शिक्षक ठरलेत मानकरी. ; शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते होणार वितरण.

सावंतवाडी : नामदार दीपक केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडी या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ देऊन गुणवंत शिक्षकांचा सन्मान केला जातो. यंदा पुरस्काराचे सलग अकरावे वर्ष असून विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट असे आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रेरणेने व नामदार दीपक केसरकर मित्रमंडळाचे राजन पोकळे, आबा केसरकर, नंदू शिरोडकर यांच्या सूचनेने आणि भरत गावडे, महादेव देसाई, विठ्ठल कदम, अजय सावंत, डी. एस. पाटील यांच्या निवड समितीने विशेष योगदान देणाऱ्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. लवकरच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सदर पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

‘हे’ शिक्षक ठरलेत गुरुसेवा सन्मान पुरस्काराचे मानकरी –

सावंतवाडी तालुका –
सौ. प्रज्ञा प्रवीण राऊळ (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरवडे क्रमांक १), सूर्यकांत अनंत सांगेलकर (बांदा हायस्कूल),

दोडामार्ग तालुका – जयसिंग बळीराम खानोलकर (केंद्र शाळा दोडामार्ग, नंबर १), हनुमंत रामचंद्र सावंत (न्यू इंग्लिश स्कूल भेडशी),

वेंगुर्ला तालुका – वैभवी शिरोडकर (जीवन शिक्षण विद्यामंदिर आरवली), अमर तांडेल (वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला)

कुडाळ तालुका – हृदयनाथ लक्ष्मण गावडे (जिल्हा परिषद शाळा, तेंडोली), दिनेश आजगावकर (कुडाळ हायस्कूल, कुडाळ).

मालवण तालुका – शर्वरी शिवराज सावंत (केंद्रशाळा मसुरे नंबर १), प्रवीण प्रभाकर कुबल (रेकोबा माध्यमिक विद्यालय, भूतनाथ – वायरी)

कणकवली तालुका – संतोष यशवंत देसाई (केंद्र शाळा नांदगाव, नंबर १), विष्णू विठोबा वगरे (न्यू इंग्लिश स्कूल, कळसुली).

देवगड तालुका – रामू लक्ष्मण अमरापुरकर (जिल्हा परिषद शाळा, वाधिवरे), सौ. तनुजा तानाजी वरक (भाऊसाहेब लोकेगावकर विद्यालय, गिर्ये),

वैभववाडी तालुका – चेतन अंबाजी बोडेकर (रामेश्वर विद्यामंदिर, एडगाव), अविनाश कांबळे (न्यू इंग्लिश स्कूल, हेत)

तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल काही शिक्षकांना ‘विशेष सन्मान पुरस्कार’ दिले जाणार आहेत. या पुरस्कारांचे मानकरी पुढीलप्रमाणे –

शुभेच्छा गुणाजी सावंत (बांदा), पूजा पराग पणदूरकर (कुणकेरी), सुरेश जानू काळे (विलवडे), शुभांगी पास्ते (अंगणवाडी वेर्ले), रश्मी रवींद्र सावंत (माडखोल), गणपती पाटील (कुंभवडे), सुहास रावराणे (वैभववाडी), जयवंत पाटील (दाणोली हायस्कूल, दाणोली), प्रदीप सावंत (माऊली विद्या मंदिर, सोनुर्ली).

या सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles