Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

रूपेश राऊळांचा ‘लाडक्या बहिणीं’कडून स्नेहसत्कार.! ; निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान यशस्वी झाल्याचे.

सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून शिवसेना सावंतवाडी विधानसभा संपर्क यात्रा अत्यंत दिमाखात व यशस्वीरीत्या पार पडली. या यशस्वी अभियानामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील तमाम शिवसैनिकांमध्ये नवा जोश, उत्साह संचारला आहे. याचे श्रेय तमाम शिवसैनिकांसह धडाडीचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांना जाते. म्हणून सावंतवाडी उबाठा सेना महिला आघाडीतर्फे रूपेश राऊळ यांचा सहृदय स्नेहसत्कार करण्यात आला. हा सत्कार उबाठा सेनेच्या सावंतवाडी शहर संघटक श्रुतिका दळवी नेमळे गावाच्या सरपंच दीपिका बहिरे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष नम्रता झरापकर, सावंतवाडी तालुका उपसंघटक रूपाली चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक रश्मी माळवदे, कल्पना शिंदे यांनी घडवून आणला .

यावेळी तालुका संघटक मायकेल डिसोझा, विभाग प्रमुख सुनील गावडे, शिवधूत अशोक परब, विनोद ठाकूर, बाळू गवस, अशोक धुरी यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles