मालवण : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी वराडकर हायस्कूल, कट्टा येथे संपन्न झालेल्या 19 वर्षाखालील मुलांच्या तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा प्रकारात स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा संघ काळसे संघाला नमवून विजयी झाला असून जिल्हास्तरावर मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर 19 वर्षाखालील मुलींचा संघ उपविजेता ठरला.
मुलांच्या संघात राज लाड, आर्यन सुर्वे, शुभम लुडबे, मयुर बागवे, सार्थक आचरेकर,आयुष म्हापणकर, निशांत शिरोडकर, रोहन कांदळगांवकर, तानाजी मानवर, सुरज आळवे यांचा समावेश होतो. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण, सचिव श्री.चंद्रशेखर कुशे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.विजय केनवडेकर यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मालवण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्तुंग यश! ; मुलांचा संघ अव्वल तर मुलींचा संघ उपविजेता!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


