कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात ५ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी संपूर्ण महाविद्यालय तृतीय वर्षाचे विद्यार्थी अध्यापन आणि प्रशासकीय कार्य करून सांभाळणार आहेत.
शालेय स्तरावर अशा पद्धतीचे उपक्रम सर्वत्र साजरे होतात. परंतु महाविद्यालय पातळीवर अशा पद्धतीचा ‘कॉलेज डे ‘ साजरा करणारे कणकवली कॉलेज हे मुंबई विद्यापीठातील ग्रामीण भागातील एकमेव महाविद्यालय आहे.
या निमित्ताने तृतीय वर्ष कला ,वाणिज्य व विज्ञान या वर्गातील विद्यार्थी राष्ट्रीय शिक्षक दिनी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या सर्व वर्गाला अध्यापन करणार आहेत. त्याबरोबरच शिक्षक दिनाच्या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन , ग्रंथालय व कार्यालयीन कामकाजाचाही अनुभव ते घेणार आहेत.
अभिरूप प्राचार्य म्हणून तृतीय वर्ष संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थी भूषण सावंत जबाबदारी सांभाळणार आहे तर १०० विद्यार्थी प्राध्यापक म्हणून अध्ययन ,अध्यापन, मूल्यमापन व प्रशासनात सहभाग घेणार आहेत .
यावेळी विद्यार्थी प्राध्यापकांचे मूल्यमापन करण्यात येणार असून विभागनिहाय गुणवंत विद्यार्थी प्राध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या नावीन्यपूर्ण उपक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, प्र. प्राचार्य युवराज महालिंगे उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालयाच्या या प्रयोगशील उपक्रमास शिक्षण प्रेमी, पत्रकार व माजी विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, समन्वयक डॉ. सोमनाथ कदम यांनी केले आहे.
शिक्षकदिनी विद्यार्थीच सांभाळणार कॉलेज.! ; कणकवली कॉलेजचे तृतीय वर्षाचे विद्यार्थी घेणार अध्यापन आणि प्रशासकीय कार्याची अनुभूती.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


