साक्षी, विभव, गार्गी, यश, सोहम ठरले बुद्धिबळ स्पर्धेत बाजीगर.! ; सावंतवाडी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

सावंतवाडी :  येथील मुक्ताई अकॅडेमीतर्फे विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन राणी पार्वती देवी शाळेच्या सभागृहात करण्यात आले. स्पर्धेत पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या पाच गटात तब्बल 72 मुलांनी सहभाग घेतला. प्रत्येक गटातील पाच विजेत्यांना अशी एकूण पंचवीस रोख बक्षिसे, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रं देण्यात आली.विशेष म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच शाळांसाठी “बेस्ट स्कुल” ट्राॅफी हा पुरस्कार देण्यात आला.
सावंतवाडीतील प्रसिद्ध न्युरो सर्जन डाॅ. अंबापूरकर यांनी बुद्धिबळ खेळल्याने विद्यार्थ्यांना होणारे फायदे सांगितले. मुक्ताई अकॅडेमी कोकणातील मुलांसाठी व्यासपीठ मिळवून देते हे कौतुकास्पद आहे, हे सांगताना अशा अकॅडेमीमधून मिळणारे प्रशिक्षण मुलांनी घ्यावे, असे डाॅ.अंबापूरकर म्हणाले.सुभेदार सावंत यांनी ॲकेडमीच्या उपक्रमाला शुभेच्छा देताना विदयार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.डाॅ.अंबापूरकर, सुभेदार सावंत, ज.ल.शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या श्रीमती अनुपमा शेटगे, किरण सावंत, प्रवीण सावंत, कौस्तुभ पेडणेकर आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

विजेते पुढीलप्रमाणे –
1) पहीली ते चौथी मुलगे  –
प्रथम यश सावंत, द्वितीय दक्ष वालावलकर, तृतीय अद्विक पाटील, चौथा स्मित सावंत, पाचवा विघ्नेश अंबापूरकर
2) पहीली ते सहावी मुली –
प्रथम गार्गी सावंत, द्वितीय आस्था लिंगवत, तृतीय मायरा काजरेकर, चौथी पलक पाटणकर, पाचवी श्रेया सावंत
3) पाचवी ते सातवी मुलगे –
प्रथम सोहम देशमुख, द्वितीय बृंधव कोटला, तृतीय चिन्मय चव्हाण, चौथा हर्ष राऊळ, पाचवा प्रज्योत पुराणिक
4) सातवी ते महाविदयालयीन मुली –
प्रथम साक्षी रामदुरकर, द्वितीय किमया केसरकर, तृतीय आरना राणे, चौथी समृदधी दळवी, पाचवी शाल्मली पाटील
5) आठवी ते महाविदयालयीन मुलगे –
प्रथम विभव राऊळ, द्वितीय यथार्थ डांगी, तृतीय वेदांत देसाई, चौथा सोहम कोरगावकर, पाचवा कुणाल हरमलकर

“Best School” ट्राॅफी हा पुरस्कार “शांतीनिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल” या शाळेला देण्यात आला.उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles