Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अंमली पदार्थ सेवन आणि वाढत असलेल्या युवा वर्गाच्या मृत्यूबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे डॉक्टर्स बांधवांनी वेधले लक्ष! ; सिंधुदुर्ग जिल्हा ‘आयएमए’ तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!

सिंधुदुर्ग :  जिल्ह्यातील युवा वर्गात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सेवन होत असल्यामुळे अनेक युवक दगावत चालले आहेत. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा आयएमए (ॲलोपॅथी डॉक्टर संघटना) तर्फे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना  जिल्ह्यातील तमाम डॉक्टर्स बांधवांनी आज निवेदन सादर करून सदर घटनेकडे लक्ष वेधले.

यावेळी सावंतवाडी येथील डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. अमुल पावसकर, डॉ. कादंबरी पावसकर, डॉ. शंतनु तेंडुलकर, डॉ. दत्तात्रय सावंत, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. खटावकर, डॉ. कश्यप देशपांडे, डॉ. मिलिंद खानोलकर तसेच कुडाळ येथील डॉ. निगुडकर, डॉ. आकेरकर, डॉ. सुधीर रेडकर, डॉ. पाटणकर, डॉ. संजय केसरे, डॉ. गुरूराज कुलकर्णी, डॉ. मकरंद परूळेकर, डॉ. सौ. परूळेकर तसेच मालवण येथील डॉ. विवेक रेडकर, डॉ. लिमये, डॉ. सौ. लिमये, डॉ. सोमवंशी, डॉ व सौ. झांटये, डॉ. हरीश परूळेकर, डॉ. राहुल वझे, कणकवली येथील डॉ. आंबेरकर, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. रेवडेकर, डॉ. शेळके, डॉ. संदीप सावंत, डॉ. रासम, डॉ अंबापुरकर, डॉ रवि जोशी, डॉ व सौ बावधनकर (तळेरे) डॉ पंडीत (कुडाळ) डॉ जी टी राणे, डॉ संजय सावंत (कुडाळ) असे तब्बल ५५ डॉक्टर्स उपस्थित होते.

आपल्या निवेदनात आयएमए संघटनेने म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात युवावर्गामध्ये गांजा,चरस बरोबरच एमडीएमए,एक्स्टसी आणि तत्सम ड्रग्सच्या सेवनाचे प्रमाण फारच वाढलेले आहे.

काॅलेज, शाळा यांच्याजवळ अशा अंमली पदार्थांची सहज होत असलेली उपलब्धता हे त्याचे एक महत्त्वाचे कारण आहेच पण त्याच बरोबर या अंमली पदार्थ सेवना विरोधात समाजाच्या प्रबोधनाचा अभाव हे देखील त्याला जबाबदार आहे. नजिकच्या काळात या व्यसनांच्या अतिसेवनामुळे काही युवकांचे मृत्यू देखील झालेले आहेत.तसेच जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत वाढत असलेल्या युवकांच्या आत्महत्यांमागे अंमली पदार्थाचे सेवन हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे कळते.

तरीही आम्ही जिल्ह्यातील आयएमए (ॲलोपथी डॉक्टर्स संघटना) तर्फे आपल्याला अंमली पदार्थाचा कडक बंदोबस्त करण्यासाठी नम्र विनंती करत आहोत. आपण या गोष्टीत जातीने लक्ष घालून याचा बंदोबस्त कराल आणि जिल्ह्यातील युवा वर्गाचे भविष्य उज्ज्वल होण्यास दिशादर्शक ठराल अशी आमची आशा आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles