Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

टीम इंडियाने मॅच जिंकली, पण ओमानच्या संघाने झुंजवले! ; पाकिस्तान सामन्याआधी BCCI टेन्शनमध्ये?

अबुधाबी : आशिया कप 2025 च्या 12 व्या सामन्यात भारताने ओमानचा 21 धावांनी पराभव केला. ओमानच्या फलंदाजांनी दमदार खेळ करत एक क्षणासाठी भारतीय चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली होती. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 188 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानची झुंज 167 धावांवर थांबली. पण त्यांनी भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. ओमानकडून आमिर कलीम आणि हम्माद मिर्झा यांनी अर्धशतक झळकावत सामना रंगतदार बनवला.

भारतीय गोलंदाजांना ओमानच्या संघाने झुंजवले –

भारताविरुद्ध 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ओमानने स्थिर सुरुवात केली. कर्णधार जतिंदर सिंग आणि अमीर कलीम यांनी पहिल्या विकेटसाठी 56 धावांची सलामी भागीदारी केली. ओमानसाठी ही अपेक्षेपेक्षा खूपच चांगली सुरुवात होती. नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कर्णधार जतिंदर झेलबाद झाला तेव्हा ओमानला पहिला धक्का बसला. जतिंदरने 33 चेंडूत 32 धावा केल्या. जतिंदर बाद झाल्यानंतर, अमीर कलीम आणि हम्मादा मिर्झा यांनी ओमानसाठी जबाबदारी सांभाळली. दोन्ही खेळाडूंनीही त्यांचे अर्धशतक पूर्ण केले, परंतु संघाला विजय मिळवून देण्यासाठी ते पुरेसे नव्हते.

संजू सॅमसनने ठोकले अर्धशतक, टीम इंडियाने केल्या 188 धावा –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 8 गडी गमावून 188 धावा केल्या. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने 45 चेंडूत 56 धावा केल्या, ज्यात 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. अभिषेक शर्माने 15 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 38 धावा केल्या. तिलक वर्माने 18 चेंडूत 29 धावा केल्या आणि अक्षर पटेलने 23 चेंडूत 26 धावा केल्या. शुभमन गिल, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या सामन्यात अपयशी ठरले. गिल 5, हार्दिक 1 आणि शिवम 5 धावा करून बाद झाला. ओमानकडून गोलंदाजी करताना शाह फैसल, जितेन आणि आमिर कलीम यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

पाकिस्तान सामन्याआधी BCCI टेन्शनमध्ये?

सुपर 4 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आहे. पाकिस्तान या सामन्यात सूड घेण्याच्या भावनेने उतरेल, परंतु टीम इंडियासमोर पाकिस्तान संघ खूपच कमकुवत दिसत आहे. परंतु ओमानच्या संघाने भारतीय संघाच्या गोलंदाजांना चांगल्याच घाम फोडला, ज्यामुळे पाकिस्तान सामन्याआधी BCCI टेन्शनमध्ये आली आहे. पाकिस्तान व्यतिरिक्त, सुपर 4 मध्ये टीम इंडिया श्रीलंका आणि बांगलादेशशी देखील सामना करेल. श्रीलंकेचा संघ आतापर्यंत आशिया कपमध्ये एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे, टीम इंडिया हा सामना हलक्यात घेणार नाही.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles