Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आरोस माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २२ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन.

सावंतवाडी : आरोस येथील श्री देवी माऊली मंदिरात सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार २२ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार २२ रोजी दुपारी १२ वाजता घटस्थापना, रात्री ७ वाजता आरती दिवे, आरास महिलांसाठी, त्यानंतर भजनाचा कार्यक्रम.

मंगळवार २३ रोजी रात्री ७ वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी, रात्री ८ वाजता श्री देवी शर्वाणी दांडिया ग्रुप,पार्से गोवा समई नृत्य, श्री सातेरी महिला कलासंघ, कासारवर्णे पेडणे गोवा.

बुधवार २४ रोजी रात्री ७ वाजता आरती, दिवे आरास महिलांसाठी, रात्री ८ वाजता भजनाचा कार्यक्रम.

गुरुवार २५ रोजी रात्री ७ वाजता आरती, दिवेआरास महिलांसाठी,रात्री ७.३० वाजता श्री कुलदेवता महिला भजन व फुगडी मंडळ, तोरसे गोवा यांचा भजन व फुगडीचा कार्यक्रम, रात्री १० वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ, यांचा नाट्यप्रयोग.

शुक्रवार २६ रोजी रात्री ७ वाजता आरती, दिवेआरास महिलांसाठी,त्यानंतर भजनाचा कार्यक्रम.

शनिवार २७ रोजी रात्री ७ वाजता आरती, दिवेआरास महिलांसाठी, रात्री ९ वाजता गायन स्पर्धा.

रविवार २८ रोजी रात्री ७ वाजता आरती, दिवेआरास महिलांसाठी रात्री ७.३० वाजता निसर्गप्रेमी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे कोकणातील देवराई आणि राखणदार या विषयावर मार्गदर्शन, रात्री ९.३० वाजता भक्तीभाव गायनाचा कार्यक्रम.

सोमवार २९ रोजी रात्री ७ वाजता आरती,रात्री ९.३० वाजता सखी फुगडी ग्रुप,पावशी त्यानंतर श्री तारादेवी फुगडी संघ,केळूस यांचा जुगलबंदी फुगडीचा कार्यक्रम.

मंगळवार ३० रोजी सकाळी ८ वाजता श्री देवी माऊली चरणी लक्ष्मी नारायण ह्रदय व विविध सुक्ता अभिषेक अनुष्ठान व धार्मिक विधी,आरती व तिर्थप्रसाद,रात्री ७ वाजता आरती, रात्री ९.३० वाजता आठवणीतील दशावतार हा सुमधूर संगीताचा कार्यक्रम.

बुधवार १ रोजी सकाळी ८ वाजता लक्ष्मी नारायण याग व अनुष्ठान व कुंकुमार्चन,श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता आरती,तीर्थप्रसाद,महाप्रसाद, रात्री ७ वाजता आरती,त्यानंतर भजनाचा कार्यक्रम.

गुरुवार २ रोजी दुपारी २ वाजता चपई नृत्य, दुपारी ३ वाजता शिवलग्न दसरा होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles