सावंतवाडी : जिल्ह्यातील शिक्षक हे गुणवत्तापूर्वक मार्गदर्शन करतात. त्यामुळेच महाराष्ट्रात सिंधुदुर्ग पहिल्या क्रमांकावर येतो, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. याच खरं श्रेय शिक्षकांना आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी काढले. सावंतवाडी येथील गुरुसेवा सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
श्री. केसरकर म्हणाले, दरवर्षी आम्ही हा सन्मान करतो. विद्यार्थी, शिक्षकांच्या कामाची नोंद कोणीतरी घ्यावी लागते यासाठी हा उपक्रम घेतो. जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान आम्ही करतो. शिक्षणमंत्री मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा इथल्या भागाला, शिक्षक, विद्यार्थी यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केला. इथल्या विद्यार्थी, शिक्षकांचा मला अभिमान वाटतो असे उद्गार त्यांनी काढले.
माजी मंत्री, आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आदर्श शिक्षक गुरुसेवा सन्मान पुरस्कार व दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ सावंतवाडीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, ॲड. निता सावंत – कविटकर, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नारायण उर्फ बबन राणे, गटशिक्षणाधिकारी सविता परब, सचिन वालावलकर, प्रेमानंद देसाई, अनारोजीन लोबो, भारती मोरे, बाबु कुडतरकर, वासुदेव होडावडेकर, अर्चित पोकळे, विकास गोवेकर, निखिल सावंत आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर यांच्या हस्ते दीपक राऊळ, जि. प. तिरोडे शाळा नंबर १, अभिजीत जाधव, कलंबिस्त हायस्कूल कलंबिस्त, बाबाजी भोई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जि. प. शाळा माणगाव, राजेंद्र राठोड, भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड, रामजी पोळजी, जि.प.शाळा मठ, शीला सामंत, एस आर पाटील हाय पाट, देवीदास प्रभूगावकर जि. प. शाळा रेवतळे, राजू देसाई, भंडारी हायस्कूल मालवण, स्वाती हिंदळेकर, जि. प. शाळा दाभोळे नं. २, आफ्रीन बागी, देवगड हाय. देवगड, वंदना राणे, जि. प. शाळा कणकवली नंबर १, सौ .स्मिता गरगटे, एस एस हाय. कणकवली, प्रवीण देसाई, जि. प. शाळा झोळंबे, समीर परब, झोळंबे हायस्कूल झोळंबे, वैभववाडी शोभा केळकर, जि. प. विद्यामंदिर खांबाळे, संदेश तुळसलकर, अर्जुन रावराणे हाय. वैभववाडी यांना गुरू सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच बाबली चिले, शंकर पावसकर, संगीता सावंत, घनदा शिंदे, उन्नती कराळे, अनुराधा गावडे, सुनिता दळवी, कल्पना बोडके यांचे विशेष सन्मान करण्यात आले. सार्जंट अनंत चिंचकर व प्रशिक्षक गोपाळ गवस याचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, दीपक केसरकर यांच्या हस्ते मिळालेला सन्मान आपणास एका उंचीवर घेऊन जाईल. राजकारणात आदराने वागणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत. त्यात श्री. केसरकर एक आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल यश फार मोठं आहे. त्यांच्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. पालकांनी मुलांच्या कलाने त्यांना भविष्य निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पालव तर आभार सीमा पंडीत यांनी मानले.


