Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

Big Breaking – जयदीप आपटेला अटक, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दुसरी मोठी कारवाई.

कल्याण : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे. कल्याणमधील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आलीये. जयदीप आपटेला पकडण्यासाठी सात पथकं नेमण्यात आली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने जयदीप आपटेला आज ताब्यात घेतलंय.

जयदीप आपटेला अटक करण्यासाठी 5 ते 7 पथकं नेमण्यात आली होती. डीसीपी गुंजाळ यांच्या दालनामध्ये जयदीप आपटेला नेण्यात आलं आहे. त्याची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणात स्ट्रक्चरल कन्संल्टंट चेतन पाटील याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण मधील राजकोट किल्ल्यावर 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. त्या प्रकरणी सिंधुदुर्गाातील मालवण पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एक आरोपी म्हणजे स्ट्रक्चरल कन्संल्टंट चेतन पाटील याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून जयदीप आपटे फरार होता. त्याला आता कल्याणमधून अटक करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग पोलीस आपटेला घेऊन रवाना –

सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार करणाऱ्या जयदीप आपटेला कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या टीम कडून ताब्यात घेण्यात आले. जयदीप आपटे याला अटक करण्यासाठी पाच ते सात टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यातील कल्याण मधील पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या टीमने रात्री जयदीप आपटेला घरातून ताब्यात घेतलं. सिंधुदुर्गचे पोलीस जयदीप आपटेच्या मागावरच होते. कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी आरोपी जयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाले आहेत.

जयदीप आपटेच्या अटकेनंतर काँग्रेसचा सवाल –

जयदीप आपटेला त्याच्या घरातून अटक केली. याचा अर्थ तो स्वतः समोर आला, पोलिसांना सापडला नाही. हा निष्कर्ष निघू शकतो. असो!त्याला असलेल्या वरदहस्तामुळे तो सापडायला इतका वेळ लागला का? हा प्रश्न आहेच, असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles