अंबानींच्या चिरंजीवांची ‘लालबाग राजा’ मंडळात मानाच्या पदी नियुक्ती ; निभावणार ‘ही’ महत्त्वाची भूमिका.

मुंबई : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी करतात. अनेक सेलिब्रिटी देखील लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी हजेरी लावतात. लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देश-विदेशातील व्हीव्हीआयपी देखील उपस्थित राहतात. अशातच देशासह जगभरातील श्रीमंतांच्या यादीत मोठ्या दिमाखात स्थान मिळवणारं अंबानी कुटुंब देखील दरवर्षी लालबाग राजाच्या दर्शनासाठी आवर्जुन उपस्थिती लावतं. अशातच यंदाच्या वर्षी अंबानी कुटुंबातील एका सदस्याची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील एका मानाच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची ‘मानद सदस्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साधारणतः महिन्याभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मंडळानं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

अंबानी कुटुंब दरवर्षी लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी आवर्जुन हजेरी लावतं. लालबाग राजा मंडळाला दरवर्षी अंबानींकडून मोठी देणगी देखील दिली जाते. याच पार्श्वभूमीवर अनंत अंबानींचा थेट कार्यकारी मंडळात समावेश केल्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भूमिकेची विशेष चर्चा होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles