Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षपदी सौ. नमिता कीर तर कार्याध्यक्षपदी डॉ. प्रदीप ढवळ यांची फेरनिवड! ; विविध समित्या व विश्वस्तांची घोषणा ; २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी कार्यकारिणी निश्चित!

कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी नमिता कीर आणि कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची पुढील तीन वर्षासाठी फेर निवड करण्यात आली आहे. कोमसापची केंद्रीय वार्षिक सर्वसाधारण सभा आज कुडाळ मध्ये झाली त्यावेळी २०२५ ते २०२८ यापुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.

कोकण मराठी साहित्य परिषदेची केंद्रीय वार्षिक सभा आज कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात अध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, कार्यवाह माधव अकलंगे, दीपा ठाणेकर, गजानन पाटील, एल. बी. पाटील, प्रकाश दळवी, मधुकर टिळेकर, मंगेश मसके, दीपक पटेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

नूतन अध्यक्ष नमिता कीर यांनी केंद्रीय समितीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली. यामध्ये संस्थापकीय अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी निवडलेल्या विश्वस्तांच्या नावांची घोषणा श्रीमती कीर यांनी केली. यामध्ये मंत्री उदय सामंत, आ. संजय केळकर, प्रा. एल. बी. पाटील, रेखाताई नार्वेकर, अनुप कर्णिक यांचा समावेश आहे. नूतन केंद्रीय कार्यकारिणीत अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, कार्यवाह माधव अकलंगे, दीपा ठाणेकर, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी यांच्यासोबत सात जिल्ह्यातील सात अध्यक्ष आणि जिल्हा प्रतिनिधी अशा १४ जणांची देखील निवड करण्यात आली. त्यांची नावे नूतन अध्यक्षा नमिता किर यांनी जाहीर केली.

त्यामध्ये मंगेश मस्के, रुजरियो पिंटो, आनंद शेलार, बाळासाहेब लबडे, संजय गुंजाळ, गणेश कोळी, मोहन भोईर, रूपचंद भगत श्रीम. विद्या प्रभू, जगदीश भोवड, तुकाराम कांदळकर, योगेश जोशी, प्रवीण दवणे, सुहास राऊत यांचा समावेश आहे. त्याचबरोबर विविध समित्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये केंद्रीय साहित्य संमेलन समिती – केंद्रीय अध्यक्ष, केंद्रीय कार्याध्यक्ष, झपूर्झा प्रकाशन समिती सौ नमिता कीर, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन व पुस्तकांचे गाव समिती – गजानन पाटील, महिला साहित्य संमेलन समिती सौ उषा परब व सौ वृंदा कांबळी, युवाशक्ती दक्षिण कोकण (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हा) – अरुण मौर्ये, उत्तर कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई) नाट्य समिती डॉ. अनिल बांदिवडेकर, किरण येलये, मंदार टिल्लू, अमेय धोपटकर, समन्वय समिती – रवींद्र आवटी, जयू भाटकर, अनंत वैद्य, अशोक बागवे, चंद्रमोहन देसाई, विधी व कायदा समिती – ॲड. स्वाती दीक्षित, लेखा परीक्षण समिती – मधुकर टिळेकर, कोमसाप भवन बांधकाम समिती – गजानन पाटील, माधव अकलंगे, प्रकाश दळवी, संदीप वालावलकर, आदींची निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी विविध पुरस्कारांची घोषणा देखील करण्यात आली. कोमसाप ३२ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी खूप चांगली चर्चा झाली. या चर्चेत श्री. दळवी, जयू भाटकर, ॲड. नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, सुरेश ठाकूर, मुश्ताक खान आदींनी भाग घेतला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सिंधुदुर्गचे अध्यक्ष मंगेश मसके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव अकलंगे यांनी केले. या सभेला पालघर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles