Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

पुणे येथून इंजिनिअरिंगचा तरुण बेपत्ता, शेवटचा कॉल सुरतहून! ; सहा महिने उलटूनही पत्ता नाही, आई – बाबा प्रचंड तणावात!

पुणे / धुळे : पुण्यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत असलेला मूळ धुळे येथील तरुण अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाचा शेवटचा फोन हा गुजरात राज्यातील सुरतमधून आल्याचे समजते. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांनी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून, हा तरुण धुळे जिल्ह्यातील आहे तो पुण्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी आला होता.

बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आदित्य पंकज खरे (वय १८ वर्ष ३ दिवस) असे आहे. या तरुणाचे वडील पंकज प्रकाश खरे यांनी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पंकज खरे हे आपल्या पत्नी वैशाली खरे आणि लहान मुलगा वंश। वय १५ वर्ष) यांच्यासोबत धुळे जिल्ह्यात राहतात, त्यांचे धुळ्यात फोटोग्राफीचे दुकान असून, यावर त्यांचे घर चालते. व त्यांचा मोठा मुलगा आदित्य हा पुण्यातील एस पी एन कॉलेज वाघोली (ता. हवेली जि. पुणे) येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होता. तो वाघोली परिसरातील गुलमोहर पार्क लिटिल चॅम्प स्कुल, (ता. हवेली जि पुणे) येथे तेजस दीपक भाईक चैतन्य भरत इसवे, सिद्धेश योगेश पाटील, अथर्व संदीप मुळे, हर्षद वरुडे पा मित्रांसह राहत होता. वडिलांनी नेहमीप्रमाणे जेव्हा आदित्यला २७/०३/२०२५ रोजी कॉल केला तेव्हा सकाळी त्याचा फोन बंद लागला. सायंकाळी सात वाजेपर्यंत त्याला सतत फोन केला मात्र, तेव्हाही त्याचा फोन बंद येऊ लागला. त्यानंतर वडील पंकज यांनी आदित्यचा मित्र आणि रुममेट असलेल्या सिद्धेश पाटील याला फोन करून आदित्य कोठे आहे? त्याचा फोन लागत नाही असे विचारले. यावेळी सिद्धेशने सांगितले, सकाळ पासूनच आदित्य हा रूमवर नाही. आणि त्याचा मोबाईल देखील रुममध्ये त्याच्या बॅगमध्ये आहे. आदित्य याने मला सांगितले होते की. तो बाहेर फिरायला चालला आहे. तो त्याच्यासोबत त्याच्या कपड्यांची बॅग घेऊन गेला आहे. आणि अजून तो रूमवर परत आलेला नाही. या फोन कॉलनंतर पंकज हे तातडीने धुळ्यातून पुण्यात आले. आणि आदित्यच्या वाघोली येथील रूमवर दुसऱ्या दिवशी सकाळी पोहचले. यावेळी त्यांनी त्याच्या मित्रांशी विचारपूस करून त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. नंतर २८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आदित्य चाने त्याचा मित्र सिद्धेश पाटीलला फोन केला आणि सांगितलं की, हा माझा शेवटचा कॉल आहे. माझ्या पप्पांना सांगून दे असे म्हणत फोन कट केला. त्यानंतर पुन्हा त्या नंबरवर संपर्क साधला असता एका व्यक्तीने कॉल उचलून, मी पाटीया सुरत वरून बोलत आहे. तुमच्या मुलाने माझ्या फोनवरून कॉल केला होता आणि कॉल झाल्यावर तो इथून निघून गेला आहे. असे सांगितले. दरम्यान, मित्राला मी बाहेरगावी फिरायला जातो म्हणून कोठेतरी निघून गेलेल्या आदित्यचा शोध वडील पकज गेल्या सहा महिन्यांपासून घेत आहेत. मात्र त्याचा अद्यापही काहीही पत्ता लागलेला नाही. अशातच आदित्य कोणाला सापडला तर तातडीने पोलिसांना कळविण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

  • बेपत्ता तरुणाचे वर्णन खालीलप्रमाणे –

नाव – आदित्य पंकज खरे, वय १८ वर्षे ३ दिवस, वर्णन – रंगाने गोरा, उंची ५.७ फूट, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे, केस बारीक काळे, कानात सोन्याची बाळी डाव्या डोळ्याच्या खाली जुना व्रण, अंगात पांढरा शर्ट फुल भाईचा, फुल काळी पॅट, पायात पांढरे रंगाचे शुज, भाषा मराठी. हिंदी इंग्रजी शिक्षण बी ई प्रथम वर्ष सोबत ब्लू रंगाची बॅग त्यात कपडे.

  • माहिती मिळाल्यास कृपया संपर्क करा – 9923239757 / 8329759740

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles