Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आपटेंना वाचविण्याचा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न : सतीश सावंत. ; चतुर्थीनंतर सरकारी विरोधात ‘मविआ’च्या माध्यमातून आंदोलन छेडणार!, सावंतांचा इशारा.

सावंतवाडी : मालवण राजकोट येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटने प्रकरणी दोषी असलेल्या जयदीप आपटे याला वाचविण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आशीर्वाद असून आपटेंना तात्काळ अटक न केल्यास गणेश चतुर्थी नंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा उभाठा सेनेचे नेते सतीश सावंत यांनी आज येथे दिला.
तर युती शासनात शालेय शिक्षण मंत्री पद मिळून केसरकर यांचे चांगले झाले असेल, महाराजांचा पुतळा पडला या वाईटातून चांगले होणार, असे ते म्हणत असतील तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. केसरकरांचा वाईटातून चांगला विकास आम्हाला नको, असा टोलाही श्री. सावंत यांनी लगावला.

श्री. सावंत यांनी आज येथील ठाकरे सेना शाखेत पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी तालुका संघटक मायकेल डिसोजा, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, कणकवली युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.

सतीश सावंत पुढे म्हणाले, राजकोट किल्ला येथील छत्रपती महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणात नेव्हीचा काहीही संबंध नाही, सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार असून दोषींना प्रयत्न या ठिकाणी केला. मुळात जरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा प्रकरणी माफी मागितली असली तरी छत्रपतींच्या बद्दल त्यांच्या मनात काहीच आधार दिसून येत नाही आज या ठिकाणी अनेक मंत्री नेते आले परंतु देवेंद्र फडणवीस या ठिकाणी का आले नाहीत ?केवळ यातील दोषी असलेल्या जयदीप आपटे यांना वाचवण्याचा चा प्रयत्न असून आपटेंना त्यांच्याकडून पूर्ण आशीर्वाद दिला गेला आहे. मात्र काही झाले तरी आम्ही या प्रकरणी गप्प बसणार नसून जोपर्यंत आपट्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहणार प्रसंगी गणेश चतुर्थी नंतर सरकारी विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन छेडणार.
ते पुढे म्हणाले, छत्रपतींचा पुतळा उभारण्याच्या कामाचे बारा भाग करून हे काम मजूर संस्थांना दिले गेले होते परंतु ठेकेदार या नात्याने यांचे पदाधिकारी यामध्ये गुंतले होते. आजकाल ठेकेदार बघून अटी शर्ती ठरवणे असे काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भाजपच्या माध्यमातून सुरू आहे. बांधकाम चा कारभार लक्षात घेता करूळ आणि गगनबावडा घाट गेले कित्येक महिने बंद आहे याला जबाबदार बांधकाम विभाग आहे. मंत्री केसरकर यांनी पुतळा प्रकरण चांगल्यातून वाईट होते असे वक्तव्य केले परंतु हे त्यांचे वक्तव्य निषेधार्य आहे मुळात केसरकर यांनी मंत्रीपद मिळवून स्वतःचे चांगले केले असेल राजांचा पुतळा पडून झालेल्या वाईटतून चांगला विकास या ठिकाणी आम्हाला नको आहे. केसरकर यांना श्रीपत मिळाले त्याचा किती जणांना फायदा झाला हे त्यांनी जाहीर करावे आजपर्यंत कोट्यावधी रुपयांच्या बाता त्या करत आले आहेत. मात्र त्यांच्या या भाता कधीच पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे त्यांनी सगळ्या विषयावर समोरासमोर येऊन बोलण्याची तयारी ठेवावी. एकीकडे जिल्ह्यातील दहशतवाद संपला असे त्यांनी जाहीर केले परंतु राजकोट किल्ला येथील राडा आणि खासदार नारायण राणे यांच्या मुखातील शब्द पाहता केसरकर यांनी दहशतवादा बाबत बोलावे. व निवडणुकीत स्वतःला फायदा व्हावा म्हणून ते राणेंच्या बाबतीत चांगले बोलत आहेत. स्वतःच्या शिक्षण खात्याचा विचार करता जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता घसरत चालली आहे संचमान्यता धरणामुळे शिक्षक तसेच विद्यार्थी पटसंख्या कमी होत चालली आहे नवीन शैक्षणिक धोरणामुळे डीएड बीएड धारकांचे कंबरडे मोडण्याचे काम शिक्षण खात्याकडून सुरू आहे एकूणच मुलांची गुणवत्ता असूनही मुले आज बेरोजगार झाले आहेत, एकूणच आम्ही याप्रकरणी आंदोलन उभारणार आहोत.

”जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून याप्रकरणी जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे, तर दुसरीकडे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. मुळात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा धाडस बांधकाम अधिकाऱ्यांनी दाखवावं, आम्ही राजकीय मतभेद विसरून प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहू”, असेही सतीश सावंत म्हणाले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles