सावंतवाडी : येथील ‘घे भरारी फाऊंडेशन’च्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त खास महिलांसाठी उद्या गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता येथील आरपीडी हायस्कूलच्या नवरंग कलामंच येथे ‘गरबा नाईट्स’चे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापिका तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, अध्यक्ष रेखा कुमठेकर, कार्याध्यक्ष मेघना राऊळ, सेक्रेटरी सलोनी वंजारी, उपाध्यक्ष संध्या पवार, खजिनदार स्वप्नाली कारेकर तसेच ,घे भरारी फाऊंडेशनच्या सर्व संचालिका शारदा गुरव, रिया रेडीज, सविता फडणीस, समिधा मडगावकर, सुश्मिता नाईक, गीता सावंत, शरदिनी बागवे, प्रतीक्षा गावकर, साक्षी परूळेकर, ज्योती दुधवडकर, सीमा रेडीज, मेघा भोगटे, मेघना साळगावकर, शुभलक्ष्मी सूर्यवंशी, अरुणा नाईक, दर्शना बाबर देसाई, शिल्पा जाधव, गीता लोहार, भूमी पटेकर आदींनी केले आहे.

महिला व मुलींसाठी आकर्षक बक्षिसे –
दरम्यान ‘घे भरारी’ फाऊंडेशनच्या वतीने या गरबा नाईट्समध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या महिला व मुलींसाठी आकर्षक बक्षिसे व लकी ड्रॉ याचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. यात बेस्ट डान्सर, बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट एनर्जीटीक परफॉर्मन्स, बेस्ट हेअर स्टाईल, स्टॅमिना प्राईज, ज्येष्ठ महिला परफॉर्मन्स तसेच लकी ड्रॉ स्पर्धेसाठी सोन्याची नथ, एक ग्रॅम दागिना, मोत्याची दागिने व इतर अनेक बक्षिसे ठेवण्यात आले असून सावंतवाडी शहरातील आणि परिसरातील महिलांनी या भव्य दिव्य गरबा नाईट्स दांडियामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन ,घे भरारी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.


