सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन आयोजित 75 व्या पुरुष व महिला खुल्या गटाच्या बास्केटबॉल राज्य स्पर्धा नागपूर येथे दिनांक 26 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपन्न होत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन मालवण या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा पुरुष व महिला संघ राज्य स्पर्धेत सहभागी होणार आहेत ..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खुल्या गटातील महिला व पुरुष बास्केटबॉल खेळाडूंना सुचित करण्यात येत आहे की महाराष्ट्र राज्य खुल्या गटातील पुरुष व महिला राज्य बास्केटबाॅल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन्ही संघ निवडले जातील. यासाठी रविवार दिनांक 28 /09/ 2025 रोजी सकाळी ठीक 9. 30 वाजता श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाऊंडेशन संचलित डॉ. श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूल, वायरी मालवण या प्रशालेच्या मैदानावर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी संबंधित इच्छुक बास्केटबॉल खेळाडूंना निवड चाचणीसाठी मैदानावर वेळीच उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुरेंद्र सपकाळ कार्याध्यक्ष विजय मागाडे यांनी केले आहे अधिक माहितीसाठी बास्केटबॉल खेळाडूंनी श्री अजय मधुकर शिंदे सचिव 94 22 39 41 86 यांच्याशी संपर्क साधावा.
श्री कॅलिस फर्नांडिस, श्री अभिजीत खानोलकर ,श्री कमलेश मयेकर, श्री नील लब्धे हे बास्केटबॉल प्रशिक्षक पुरुष व महिला संघाची निवड करतील…
बास्केटबॉल पुरुष व महिला खुला गट सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवड चाचणी २८ रोजी वायरी मालवण येथे होणार!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


