सावंतवाडी : रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी नगरपरिषद पत्रकार कक्षाच्या बाजूला सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष संजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. तरी तालुका कार्यकारी सदस्य व पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान महावितरणाच्या वाढीव वीज बिल आकारणी, रीडिंग उपलब्ध नाही, मीटर बंद आहे, मीटर दुरुस्त होत नाही, अदानीचे मीटर बसवा, जुने मीटर आता बसवत नाहीत, वाढीव वीज बिले कमी करण्यास टाळाटाळ करणे अशी विविध कारणे सांगत महावितरणकडून चाललेली वीज ग्राहक तसेच व्यापारी, व्यावसायिक, घरगुती, उद्योग, व्यवसायिक यांची चाललेली छळणूक याबाबत चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच जिल्हा वीज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघाच्या वतीने सावंतवाडी येथे वीज ग्राहक दरबार, वीज परिषदही घेण्याबाबत चर्चा व नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे अध्यक्ष संजय लाड यांनी कळविले आहे. तरी सावंतवाडी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार व सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य यांच्याकडून वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


