सावंतवाडी : सावंतवाडी शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून उद्या रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी महिलांसाठी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत वैश्य भवन हॉल, सावंतवाडी येथे होणार आहे.
या कार्यक्रमात ‘चांगली जोडी’, ‘देशभक्तीपर वेशभूषा’, ‘लकी ड्रॉ’, ‘दांडिया’, तसेच गरबा या स्पर्धा घेण्यात येणार असून महिला आणि मुलींसाठी खुल्या स्वरूपात या स्पर्धा खुल्या आहेत. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शिवसेनेचे सावंतवाडी शहरप्रमुख खेमराज उर्फ बापू कुडतरकर आणि जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना महिला आघाडीतर्फे करण्यात आले आहे.


