Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग बँकेच्या ७३ पदांच्या भरतीसाठी आता ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ.! : अध्यक्ष मनीष दळवी ; आतापर्यंत ३९३५ उमेदवारांचे अर्ज दाखल तर ६७३ उमेदवारांचे अर्ज प्रोसेसमध्ये.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 73 लिपिक पदांची भरती आयबीपीएस या कंपनीमार्फत सुरू करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत होती. आता उद्यापर्यंत असलेली मुदत वाढविण्यात आली असून उमेदवारांना ४ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत अर्ज दाखल करण्यास संधी मिळाली आहे. तरी पात्र उमेदवारांनी जास्तीत जास्त उमेदवारानी या भरती सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
दरम्यान जिल्हा बँकेतील ७३ लिपिक पदांच्या या भरतीसाठी आतापर्यंत ३९३५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर ६७३ उमेदवारांचे अर्ज प्रोसेस मध्ये आहेत. या जिल्हा बँकेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना या भरती संधी मिळावी म्हणून ४ ऑक्टोंबर पर्यंत ही मुदतवाढ दिल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.
www.sindhudirgdcc.com या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना या भरती प्रक्रियेच्या अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची मुभा मुदतवाढ देऊन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी दि. ५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ अशी मुदत होती. ती आता वाढवून ४ ऑक्टोंबर २०२५ अशी देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles