सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी ‘ग्रीन डे’ साजरा करण्यात आला.या निमित्ताने प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. हिरवा रंग म्हणजे समृद्धीचा संपन्नतेचा व पर्यावरण पूरक दृष्टीचे प्रतीक आहे.सर्व विद्यार्थ्यांनी जेवणाच्या डब्यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला होता.तसेच या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्याचा संकल्प केला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका श्रीम.संध्या मुणगेकर, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता, इंग्लिश प्रायमरी पर्यवेक्षिका श्रीम.क्लिटा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सावंतवाडीच्या मिलाग्रीस प्रशालेत ‘ग्रीन डे’ साजरा.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


