बांदा : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून डोंगराळ व दुर्गम भागातील महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या नारिंचा सन्मान म्हणजेच नवदुर्गेचा सन्मान दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी इन्सुली सावंतवाडी येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला होता. पोलीस पाटील, डॉक्टर, वकील, ग्रामपंचायत मधील महिला सरपंच आणि सदस्य या आपल्या क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल गौरव करणे आणि त्यांना समाजात अजून चांगले करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या मागचा हेतू होता.
इच्छा शक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आपण यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतो असे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी उपनगराध्यक्ष आणि यशस्वी उद्योजिका अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी या नवरात्रोत्सवामध्ये सन्मान नारीचा, सन्मान नवदुर्गेचा हा कोकण संस्थेने आयोजित केलेला कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आज साजरा करण्यात आला आहे असे ही त्या पुढे म्हणाल्या.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांचे कौतुक केले. महिला कायमच आपल्या कुटुंबांसाठी आणि समाजासाठी मोठे योगदान देत आहेत. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे ग्रामीण भागातील सामाजिक व शैक्षणिक विकास होत असून समाजाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान देत आहेत तसेच या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळे आपल्या गावाची मोठी प्रगती झाली आहे असे मत कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी व्यक्त केले “ या महिलांचा सन्मान करणे खूप महत्त्वाचे आहे. या महिलांचा सन्मान करायची संधी मिळणे हे माझं मी सन्मान समजतो असेही ते पुढे म्हणाले.
यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाला मिळालेलं महत्त्व आणखी वाढलं आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने एकत्रितपणे काम करून समाजात सकारात्मक बदल घडावा यासाठी एकत्रीत प्रयत्न करायला हवेत. कारण एकत्रित मेहनत केल्यासच आपल्याला यश मिळवता येईल.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे फ्रेम, शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. डॉक्टर, वकील, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि महिला सरपंच यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच महिलांना व्यावसायिक बनण्यासाठी काय कारावे यावर गो सोर्स या आय टी कंपनीच्या डायरेक्टर ऐश्वर्या कोरगावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नरेश शेट्ये, गुरू पेडणेकर, अशोक सावंत, बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी १६ गावातील ६७ महिला उपस्थित होत्या. आज इथे होत असलेला सत्कार म्हणजे आम्ही आमच्या क्षेत्रात करत असलेली धडपड, घेत असलेला पुढाकार आणि करत असलेले प्रयत्न यांच्यासाठी शाबासकीची थाप असून यामुळे सर्व महिलांना अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देईल असे बांदा ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजिका आणि सावंतवाडी च्या माजी उप- नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, युवा उद्योजिका ऐश्वर्या कोरगावकर, प्रोफेसर नरेश शेट्ये, माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, ऍडवोकेट राहुल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नितीन राऊळ, प्रीती पांगे, साक्षी पोटे, योगिता निजामकर,सुरज कदम, निलेश खामकर, महेश धुरी, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक सावंत, बांदा गावच्या सरपंच प्रियांका नाईक,शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, पडवे माजगाव सरपंच नयना देसाई, असनिये सरपंच रेश्मा सावंत, बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, पोलीस कॉन्स्टेबल बबिता गवस आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन समीर शिर्के यांनी प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक श्री प्रथमेश सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन कोकण संस्थेचे कार्यकर्ते, अमोल गुरम, वैष्णवी म्हाडगुत, नेहा कांबळी, अवंती गवस, पद्माकर शेटकर, ऋचा पेडणेकर, रोशनी चारी,गौरी आडेलकर केशव नाचोंणकर यांनी केले.


