मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पंच महासंघाची सर्व खेळांच्या पंचांना एकत्रित करुन पंचांसाठी नियमावली तयार करण्यासाठी शनिवार दिनांक ४/१०/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था ओरोस सभागृहात बैठक होणार आहे..
शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित ९४ खेळांच्या पंचांना एकत्रित करुन जिल्ह्यात क्रीडा चळवळ उभी करण्यासाठी क्रीडा पंच महासंघ प्रयत्न करणार आहे..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचांना वगळुन बाहेरच्या जिल्ह्यातील पंचांना जिल्ह्यात बोलावुन स्पर्धा घेण्याचा कल वाढीस लागलेला आहे यावर ठोस उपाययोजना करुन पंच यादी अद्ययावत करण्यात येईल ,जिल्ह्यात विविध खेळांच्या नवीन पंच याद्या तयार करण्यात येतील…
जिल्ह्यातील काम करणाऱ्या क्रीडा शिक्षक संघटना , क्रीडा शिक्षक पंच, असोसिएशन पंच,हौशी खेळाडू पंच यांना एकत्रित करुन प्रत्यक्ष मैदानावर येणार्या समस्या जाणून घेऊन क्रीडा पंच महासंघाची नियमावली तयार करण्यासाठी सभेत चर्चा करून अंतिम निर्णय घेतले जातील..
‘हे’ विषय सभेत चर्चेस येणार –
1)आपल्या जिल्ह्यात बाहेरच पंच बोलावलेले खपवुन घ्यायचे नाहीत…
2)पंच मानधन प्रति दिन 1000/- व दुपारचे जेवण व चहा वेगळं..
3)पंच मानधन सेमी फायनल सामन्यां अगोदर वितरीत करावे..
(मानधन सर्वांना मिळाल्याशिवाय पुढील सेमी व फायनल चे सामने वाजवले जाणार नाहीत..)
4) पंच प्रत्यक्ष मैदानावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंतच काम पहातील, वेळ वाढल्यास 200/- रुपये वाढीव मानधन द्यावे लागेल..
5) जिल्हा पंच प्रमुख मंडळ निवडणे..
6) तालुका पंच प्रमुख मंडळ निवडणे..
7)पंच महासंघामध्ये पंचांची सभासद म्हणून नोंदणी करणे, आयकार्ड बनवणे,ड्रेस कोड ठरवणे…
8) स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंना मिळणाऱ्या अपुर्या सुविधा याबाबत चर्चा..
9) आयत्यावेळी येणारे विषय…
वाढती महागाई लक्षात घेऊन औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी शालेय क्रीडा स्पर्धा पंच मानधन प्रती दिन 1000/-रुपये साठी मान्यता दिली आहे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही समान काम समान मानधन यासाठी क्रीडा पंच महासंघ आग्रही आहे…
जिल्ह्यातील काम करणाऱ्या क्रीडा शिक्षक संघटना , क्रीडा शिक्षक पंच, असोसिएशन पंच,हौशी खेळाडू पंच व विविध क्रीडा संघटना यांचे पदाधिकारी व पंच या सर्वांना सभेस येण्याचे आवाहन क्रीडा पंच महासंघाचे प्रमुख अजय शिंदे यांनी केले आहे.


