सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी चा एनएसएस व एनसीसी विभागाच्या वतीने राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र (एनसीसीआर) पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिवसाचे औचित्य साधून मालवण दांडी येथे दांडेश्वर मंदिराच्या परिसरापासून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या स्वच्छता अभियानाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोंसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या स्वच्छता अभियानामध्ये मालवण नगरपरिषद आरोग्य विभाग संजय पवार, युथ बीट्स फॉर क्लायमेटचे (मालवण) अध्यक्ष कु. मेगल डिसोजा, दर्शन वेंगुर्लेकर, स्वाती पारकर, अक्षय रेवंडकर, ऐश्वर्य मांजरेकर, मनीषा पारकर, चारुशीला देऊलकर, संजय वराडकर, भार्गव खराडे, यतार्थ खवणेकर, माजी वनअधिकारी सुभाष पुराणीक, कांदळवन विभाग परिमंडल वनअधिकारी मालवणचे सत्यवान सुतार, मंडलधिकारी वेंगुर्लाचे सुनील सावंत, ‘युएनडीपी’चे केदार पालव आणि टीम, निलक्रांती (मालवण)च्या सोनाली परब, दांडी येथील नारायण धुरी, प्रवीण कुबल, स्वप्निल गोसावी, सन्मेश परब, प्रसाद सामंत, अंजना सामंत, ऋषिकेश सामंत, दत्ताराम नेरकर, इकोमेट( मालवण) संस्थेचे पदाधिकारी तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयच्या (स्वायत्त) एनसीसी, आर्मी व नेव्ही विभागाचे डॉ. सचिन देशमुख, डॉ. विशाल अपराध, आर्मी गर्ल्स विभागाच्या डॉ. कविता तळेकर, एनएसएस विभागाचे समन्वयक डॉ. यु.सी पाटील, डॉ. सौ.सुनयना जाधव, प्रा एम बी बर्गे, प्रा. रोहन सावंत, प्रा. एम. व्ही भिसे, प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. गणेश मर्गज, डॉ.शलाका वालावलकर, डॉ. रवीना गवस , शिवाजी राठोड, वरिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छता अभियानाचे समन्वयक डॉ. गणेश मर्गज यांनी प्रास्ताविक केले त्यांनी किनाऱ्यावरील स्वच्छतेचे महत्त्व सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय अनुसंधान केंद्र चेन्नई, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे असे नमुद केले कार्यक्रमाचे उद्घाटक युवराज लखमराजे भोंसले यांनी मालवण सारख्या समुद्रकिनाऱ्याला वर्षभरामध्ये लाखो पर्यटक भेट देत असतात त्यामुळे येथील किनारे स्वच्छ ठेवणे ही पर्यटनाचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आमच्या महाविद्यालयाच्या वतीने व NCCR चेन्नईच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबविली जात आहे आणि त्यासाठी येथील स्थानिक संस्थांचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहून आणि आम्हाला सहकार्य केले याबद्दल समाधान वाटले. माजी वनअधिकारी श्रीसुभाष पुराणिक यांनी या स्वच्छताअभियानाचे कौतुक केले. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत अवेअरनेस होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. एनसीसीचे डॉ. सचिन देशमुख, डॉ. कविता तळेकर, एनएसएस विभागाचे डॉ. यू.सी पाटील, डॉ. सुनयना जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली. युथ बीट्स फॉर क्लायमेटच्या अध्यक्ष कु. मेगल डिसुजा हिने स्वच्छता अभियानामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली याबद्दल आयोजकांचे आभार मानले. या स्वच्छता अभियाना मध्ये 80 लोक सहभागी झाले होते. दांडी बीच वरील अर्धा किलोमीटर परिसरात एक टना पेक्षा जास्त कचरा गोळा करून तो मालवण नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द केला या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून येथे लोकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे त्यांच्यामध्ये सामाजिक भान व जागृती निर्माण व्हावी, कचऱ्यामुळे पसरणारी रोगराई याचा समुद्रातील जीवांवर होणारा परिणाम व पर्यटना वरील होणारा परिणाम याची माहिती उपस्थितांना देण्यात आली .या स्वच्छता अभियाना मधून प्लास्टिक, मेटल, काच, कागद अशा अनेक प्रकारचा कचरा पुढील प्रक्रियेसाठी मालवण नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आला.


