Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आज हरितालिकेच्या दिवशी जुळून आला ‘रवि योगा’चा शुभ संयोग ; ‘या’ राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा.

आज ६ सप्टेंबर शुक्रवारचा दिवस. आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया तिथी आहे. आज हरितालिकेचे व्रतसुद्धा केलं जाणार आहे. तसेच, आजच्या दिवशी शुक्ल योग, रवि योग, हस्त नक्षत्र यांसारखे अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.

 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ ५ राशीच्या लोकांवर होणार आहे. या पाच राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात . 

मिथुन रास –

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन आशेचा किरण घेऊन येणारा असेल. तुम्ही तुमच्या नातेवाईक, मित्र-मंडळींसह फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच, आज जर तुम्हाला एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, व्यापाराच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, दिवसेंदिवस तुमचा व्यवसाय वाढत जाईल. कामाच्या नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील.

कन्या रास –

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतील. आज तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे आणि काही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर दिवस त्यासाठी चांगला असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आज ऑफिसमध्ये अनुकूल परिस्थिती राहील, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात रस असेल आणि सर्वांशी तुमचे संबंधही चांगले राहतील. प्रेम जीवनातील लोक आज भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करतील आणि आपल्या जोडीदाराची कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकतात, ज्यामुळे नातं मजबूत होईल.

वृश्चिक रास –

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज त्यांच्या मुलांकडून किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोक रविवारच्या सुट्टीचा आनंद घेतील आणि पुढच्या दिवसाचे नियोजनही करतील. आज तुम्ही तुमच्या चैनीच्या वस्तूंवर थोडे पैसे खर्च करू शकता आणि कुटुंबातील सदस्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा मोबाईल लॅपटॉप किंवा इतर गॅझेट खरेदी करू शकता.

कुंभ रास –

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज कुंभ राशीच्या लोकांचं प्रेमळ वर्तन लोकांची मनं जिंकेल. आज तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींच्या मदतीने घरातील राहिलेली कामं पूर्ण करता येतील आणि आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर ती आज नक्कीच सुधारेल. आज तुम्ही तुमच्या रागावलेल्या जोडीदाराला शांत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.

मीन रास –

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज मीन राशीच्या लोकांचं प्रेमळ वर्तन लोकांची मनं जिंकेल. आज तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींच्या मदतीने घरातील राहिलेली कामं पूर्ण करता येतील आणि आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर ती आज नक्कीच सुधारेल. आज तुम्ही तुमच्या रागावलेल्या जोडीदाराला शांत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.

(सूचना : वरील सर्व बाबी सत्यार्थ न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक – प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही  कोणताही दावा करत नाही.) 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles