मालवण येथे समुद्रकिनारालगत शिवरायांचे स्मारक, शिवसृष्टी, व आरमाराची चित्रसृष्टी उभारण्यासाठी प्रयत्न करू.! – शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर.

सावंतवाडी : मालवण येथे समुद्रकिनारालगत शासकीय ९ एकर जमीन आहे. त्या जमिनीत महाराजांना साजेसे स्मारक, शिवसृष्टी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची चित्रसृष्टी तयार करता येईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला जाईल, असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आयोजित बैठकीनंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर पत्रकारांची बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला ही अतिशय दुःख द घटना आहे, झालेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे. वाईटातून चांगले व्हावे असे मी म्हटले होते. मात्र त्यावर राजकीय नेते व राष्ट्रवादीचे प्रदेश माजी मंत्री जयंत पाटील यांनी येऊन टीका केली ते आले आणि गेले. मात्र स्मारक आम्हीच करणार आहोत त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

श्री केसरकर पुढे म्हणाले, मालवण येथे ९ एकर जमीन शोधली आहे. ती शोधून त्या ठिकाणी महाराजांचे स्मारक,शिवसृष्टी, जेटी बांधता येईल. याठिकाणी जेटी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला, शिवसृष्टी दाखवता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल.याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे .आता तसा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे ठेवला जाईल. शिवप्रेमी आणि पर्यटकांना ते दाखवता व आकर्षित करता येईल.
ते म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सर्वोत्कृष्ट शिल्पकार बनवेल. सिंधूरत्न योजनेतून विजयदुर्ग येथे आरमाराचे प्रतीक चित्रसृष्टी उभारण्यासाठी निधी मंजूर केला आहे. तेथे देखील पर्यटकांना आकर्षित करू शकतो असे केसरकर यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles