- संजय पिळणकर
- सावंतवाडी : तालुक्यातील मडूरा – सातोसे (रेखवाडी) या गोवा राज्याच्या सिमावर्ती भागात ओंकार हत्तीने प्रवेश केला आहे. गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात चार दिवस झाले तरी अजूनही ओंकार हत्ती याच भागात तळ ठोकून आहे.वनपाल प्रकाश रानगिरे,दत्तात्रय पाटील व त्यांची टीम रात्रंदिवस हत्तीच्या लोकेशनवर नजर ठेऊन आहेत.
- दरम्यान आज सोमवार दी ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ओंकार हत्तीने मडूरा – सातोसे (रेखवाडी – काळ्या आंब्याकडे) येथे थेट रस्त्यात सुमारे अर्धा तास दर्शन दिल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मार्गांवरून रात्रीच्यावेळी प्रवास करणे सद्य स्थितीत धोक्याचे असल्याने वाहन चालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.
- https://youtube.com/shorts/YeRq3dnTjWs?feature=share
मडूरा – सातोसेच्या भर रस्त्यात ओंकार हत्तीचे पुन्हा दर्शन! ; वाहतूक विस्कळीत, वाहन चालक भीतीच्या छायेत.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


