सावंतवाडी : येथील श्री देवी रासाई युवा कला क्रीडा मंडळ जिमखाना सावंतवाडी येथील आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सौ. अंकिता आशिष सुभेदार यांनी प्रथम येऊन पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत.

सदर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी श्री रासाई कला क्रीडा मंडळचे अध्यक्ष कृष्णा लाखे तसेच युवा मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, साई खोरागडे, अनिकेत लाखे, अमित लाखे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


