सावंतवाडी : येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्यावतीने ओटवणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ज्येष्ठांना आयुर्वेदिक औषधांसह
स्वास्थ रक्षा किट देण्यात आले. तसेच या शिबिरात उपस्थितांची नेत्र तपासणीही करण्यात आली.
यावेळी भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. पाटील, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विशाल पाटील, ओटवणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ. संजीव राठोड, आरोग्य सेविका एस. एस. खडपकर, ओटवणे वाचनालयाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, माजी पोलीस पाटील तुकाराम गावकर, अंकुश नाईक, आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी तुषार पाबळे, बाळू रजापूरे, जयराज मरकड, प्रशांत नवले, आशा स्वयंसेविका सुप्रिया नाईक, रचना भालेकर, ज्ञानदा गावकर, कामिनी कोरगावकर आदी उपस्थित होते.
ओटवणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात डॉ. बी. डी. पाटील आणि डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यानी ज्येष्ठ ग्रामस्थांसह महिलांची तपासणी केली. तर नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विशाल पाटील यांनी डोळ्यांची तपासणी केली. यावेळी मधुमेह तपासणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथमच शिबीर आयोजित केल्याबद्दल ज्येष्ठ ग्रामस्थ व महिलांनी भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे आभार मानले.


