शाळा समाज परिवर्तनाचे माध्यम : विशाल परब ; भाईसाहेब सावंत विद्यालय, माजगाव शाळेच्या स्मरणपत्रिकेचे उद्घाटन विशाल परब यांच्या हस्ते संपन्न.

सावंतवाडी :  शाळा हे समाज परिवर्तन करणारे विद्येचे माहेरघर आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्याच ज्ञानाचे मंदिर शाळा असून हे संस्कार पुढील आयुष्यात कमी ठरतात, शालेय जीवनात चांगले संस्कार त्याचबरोबर कला, क्रीडा, साहित्य यांची मैत्री होते आणि यातून शैक्षणिक क्रांती घडून जाते, असे विधान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले. शालेय जीवनात, सामाजिक कार्यात अथवा शैक्षणिक पातळीवर मी कायम या विद्यालयासोबत राहीन. आपण केलेले उत्कृष्ट नियोजन खूप वाखण्याजोगे होते, असे सांगत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

शिक्षण सहाय्यक संचलित संस्था, माजगाव विद्यालयाच्या स्मरण पत्रिकेचे फीत कापून उद्घाटन श्री विशाल परब यांच्या हस्ते पार पडले. हा कार्यक्रम ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ निमित्त आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थितांना या शाळेच्या वाटचालीचे, एक प्रगती स्मरण पत्रकच मांडण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, ॲड. अनिल निरवडेकर, बाळा वेझरे, शाम कासार आदी मान्यवर तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी व माजगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विशाल परब यांनी शाळेच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles