सावंतवाडी : सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेने सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्यात ज्या – ज्या वेळी रुग्णांना रक्ताची गरज भासली, ती गरज ओळखून रक्त कमतरतेचा विघ्न दूर केला आहे. त्यामुळे युवा रक्तदाता संघटनेच्या पाठीशी विघ्नहर्ता गजानन नेहमीच राहील आणि त्यांना उदंड आयुष्य प्रदान करेल, प्रबळ शक्ती देईल, असे गौरवोद्गार सावंतवाडी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांनी काढले.
सर्वांचे विघ्न दूर सारणार्या गणरायाच्या स्वागतासाठी युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडीने तयार केलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन सावंतवाडी नगरीच्या माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, उपाध्यक्ष मेहर पडते, खजिनदार अनिकेत पाटणकर, राघवेंद्र चितारी, नंदू गावडे, सूरज मठकर, प्रथमेश प्रभू, देवेश पडते, साईश निर्गुण, वसंत सावंत, नंदू शिरोडकर, संदीप निवळे तसेच युवा रक्तदाता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


