सावंतवाडी : तालुक्याती मळगाव गावातील मागील तब्बल गेले काही महिने जेव्हा वादळ व अति वर्षाव झाला तेव्हा पोल उन्मळून पडल्यामुळे बंद असलेली स्ट्रीट लाईट निदान गणेश चतुर्थी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असतानाही स्ट्रीट लाईट बंदच असल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर आज मळगाव ग्रामपंचातीसमोर ठिय्या मांडत मळगाव सरपंच यांना जाब विचारला.
गेले सहा महिने मळगाव गावातील सर्व वाड्यातील स्ट्रीट लाईट बंद आहे. वारंवार तोंडी तक्रार करूनही स्ट्रीट लाईट सुरु गेली जात नव्हती. विचारले असता स्ट्रीट लाईटचे काम करणारा कर्मचारी नसल्याचे कारण सांगितले जात होते. मात्र आता गणेश चतुर्थी सण एका दिवसावर आल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर धडक देत स्ट्रीट लाईट अजूनही का सुरु झाली नाही याबाबत सरपंच यांना जाब विचारला. यावेळी सरपंच सोडून इतर एकही सदस्य उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ‘असली बिन कामाचे ग्रामपंचायत सदस्य आम्हाला नको’, असा सवाल उपस्थित केला.
ही बंद असलेली सर्व स्ट्रीट लाईट येत्या दोन दिवसत सुरु नाही झाली तर सोमवारी 9 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत उघडू देणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला. यावेळी मळगाव ग्रामस्थ पांडुरंग राऊळ, पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर, महेंद्र पेडणेकर, अॅड. निधी दाभोळकर, सिद्धेश आजगावकर, निखिल राऊळ, महेश राऊळ, सुदेश राऊळ, सुमेश राऊळ, संदीप राऊळ, सागर राणे, विश्वनाथ गोसावी, सहदेव राऊळ, विकास नाईक, सुरज गवंडे, बाळा राणे, नाना राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, “ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटचे काम पाहणारे कर्मचारी अचानक काम सोडून गेल्यानंतर ग्रामपंचायतीने नवीन कर्मचारी घेण्यासंदर्भात दोन वेळा वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र अध्यापपर्यन्त सदर जागेवर कोणीही अर्ज सादर न केल्याने समस्या प्रलंबित आहे. सद्या वीज वितरण कंपनीचे तात्पुरत्या स्वरूपात केवळ दोनचं कर्मचारी असल्यामुळे आणि मळगाव हे तब्बल 5000 पेक्षा अधिक लोकवस्तीचे गाव असल्यामुळे दोन कर्मचाऱ्यांकडून सर्व कामे पूर्ण होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या गावात कायमस्वरूपी वायरमन असावा, याबाबत वीज वितरण कंपनीकडे ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, लवकरात लवकर ही समस्या दूर होईल”, अशी माहिती सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी दिली.