सावंतवाडीत रंगणार ‘विशाल श्री’ भव्य बॉडी बिल्डिंगचा महासंग्राम!, भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती! ; भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार शानदार उद्घाटन!*भाजपा सिंधुदुर्गचे (फिट इंडिया) आयोजन, १ नोव्हेंबरला सावंतवाडीत ताकद, जिद्द अन् स्नायूंचे भव्य प्रदर्शन.

सावंतवाडी : स्नायूंचे सामर्थ्य, घामातून घडलेली शरीरयष्टी, कठोर मेहनत आणि जिद्दीचा थरार अनुभवण्यासाठी सावंतवाडीकर सज्ज व्हा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेतून प्रेरित भव्य शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धेचे आयोजन रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे सावंतवाडीच्या क्रीडाक्षेत्रात उत्साहाचे नवे पर्व अनुभवायला मिळणार आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी युवा मोर्चाचे अध्यक्ष हितेन नाईक यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शरीरसौष्ठवाच्या माध्यमातून युवकांमध्ये आरोग्य, व्यायाम, शिस्त आणि तंदुरुस्तीविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार दिमाखदार उद्घाटन!

या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्रातील युवा नेते आणि तरुणाईचे प्रेरणास्थान विशाल प्रभाकर परब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर तसेच ज्येष्ठ नेते आणि युवकांचे प्रेरणास्थान विनोद राऊळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उत्साह अधिकच वाढणार असून, शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन मिळणार आहे.

ताकद, शिस्त आणि जिद्दीचा अनुभव घेण्याची संधी!

शरीरसौष्ठव हा केवळ शरीर कमावण्याचा खेळ नसून त्यामागे सातत्यपूर्ण सराव, योग्य आहार, कठोर शिस्त आणि प्रबळ इच्छाशक्ती यांचा कस लागतो. या स्पर्धेतून मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंचे कौशल्य अनुभवण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

युवकांनी व्यायाम आणि आरोग्याला आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा, तसेच व्यसनांपासून दूर राहून सुदृढ शरीर आणि निरोगी मनाचा ध्यास घ्यावा, हा संदेशही या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

सावंतवाडीकरांना उपस्थितीचे आवाहन!

या भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेला सावंतवाडीतील नागरिक, युवक, क्रीडाप्रेमी आणि व्यायामप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

📅 दिनांक : रविवार, १ नोव्हेंबर २०२६

🕕 वेळ : सायंकाळी ६ वाजता

📍 स्थळ : जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी

‘सशक्त युवा, सशक्त भारत! फिट राहा, निरोगी राहा!’

सावंतवाडीच्या मातीत रंगणाऱ्या या शरीरसौष्ठवाच्या महासंग्रामात खेळाडूंच्या मेहनतीला दाद देण्यासाठी आणि युवकांच्या क्रीडास्वप्नांना बळ देण्यासाठी सावंतवाडीकरांनी आवर्जून उपस्थित राहावे!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles