पुणे : गौतमी पाटीलच्या कारचा अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय. अपघातापूर्वी वाहनातनं दोन जण खाली उतरताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत. भोरवरुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कार पेट्रोल पंपाजवळ उभी केली होती आणि त्याचवेळी पेट्रोल पंपापासून काही अंतरावरच या कारनं रिक्षाला धडक दिली. दरम्यान पुण्यातील वडगाव बुद्रुक या परिसरात मागच्या मंगळवारी हा अपघात झाला होता.
या व्हिडिओमध्ये दोन जण या कारमधून खाली उतरताना पाहायला मिळतायत आणि त्यानंतर ही कार निघून गेलेली आहे. पेट्रोल पंपाजवळ हे दोन माणसं या कारमधून खाली उतरलेले आहेत आणि त्यानंतर या पेट्रोल पंपाच्या अगदी काही अंतरावरच या कारनं रिक्षाला धडक दिली होती आणि या धडकेत तो रिक्षाचालक जखमी झाला होता. या अपघाताच्या आधीचं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे.


