उपमुख्यमंत्री दोन, पुजेचा मानकरी कोण? ; कार्तिकी एकादशीच्या महापुजेचं विठ्ठलाला कोडं!

सोलापूर : आषाढी – कार्तिकी भक्तगण येती म्हणत पंढरीलाही भाविकांची ओढ लागलेली असते. आषाढी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे. मात्रयंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणारह्या प्रश्नाचं कोडं विठ्ठलाला म्हणजेच मंदिर समितीला पडलं आहेआषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहेमात्र, राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकीची पूजा शिवसेनेचेएकनाथ शिंदे का राष्ट्रवादीचे अजित पवार ?यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता मंदिर समिती विधी व न्याय विभागाकडे करणार आहे.

पंढरीतील विठ्ठल मंदिर समितीच्या आज झालेल्या बैठकीत कार्तिकी एकादशीच्या या मुद्द्यावर चर्चा करण्यात आलीत्यानुसारकार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे का राष्ट्रवादीचे अजित पवारयापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता विधी व न्याय विभागाकडे मंदिर समितीकडून करण्यात येणार असल्याचे ठरले आहेत्यामुळेउपमुख्यमंत्री दोनपण पुजेचा मानकरी कोणअशी चर्चा पंढरीत होत आहेयंदा कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर रोजी होत असून यावर्षी कार्तिकीच्या पूजेचा मान कोणाला मिळणार हे औत्सुक्याचे असणार आहेमंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समितीची बैठक झालीत्यामध्ये आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेलाही सर्व सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आलायंदा कार्तिकी सोहळ्यात 26 ऑक्टोंबरपासून भाविकांना 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles