वेंगुर्ला : वेंगुर्ले तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार,अव्वल कारकुन यांच्याकडून कार्यालयीन कामकाजात दुर्लक्ष होत असून यामुळे तालुक्यातील जनतेची बरीच कामे खोळंबली आहेत. त्यामुळे सध्या वेंगुर्ले तहसील कार्यालयात भोंगळ कारभार सुरू असून सबंधित प्रशासनाचे अधिकारी यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी वेंगुर्ले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वेंगुर्ले तहसील कार्यालयात सध्या नागरिक यांना कार्यालयातील भोंगळ व बेजबाबदार कारभाराचा सहन करावा लागत आहे. निवासी नायब तहसीलदार,महसुल नायब तहसीलदार वेंगुर्ला यांना पदावर हजर होऊन बरेच दिवस झाले तरी कार्यालयीन कामकाजावर ते जाणुनबुजुन दुर्लक्ष करीत आहेत. तहसिल कार्यालयात प्राप्त होणारे अर्जावर (पत्र) दोघांनी स्वाक्षरी करणे व संकलन टाकणे हि जबाबदारी असताना संकलन हे चुकीच्या पध्दतीने टाकले जातात.
कोणत्याच पद्धतीचे नियोजन व समन्वय कामात दिसून येत नाही. आठ-आठ दिवस टपाल तिथेच पडून असते त्यावर तातडीची उचित कार्यवाही होत नाही. जावक टपाल तर दोन-तीन आठवडे जावक रजिस्टरला नोंदच होत नाही. हे काम समयोचित करुन घेणे हि जबाबदारी निवासी नायब तहसिलदार यांची असताना त्यात नेहमीच दिरंगाई व चालढकल करुन जनतेला नाहक त्रास दिले जातात.
तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कार्यालयीन कामकाज जलद गतीने होण्यासाठी निवासी नायब तहसिलदार, महसुल नायब तहसिलदार यांच्याकडे चॅप्टर केसेस प्रकरणे चालविण्यासाठी दिल्या आहेत पण केसेसच्या तारखा तर संबंधित लिपीकच देतो त्या चालविल्या जातच नाहीत. चॅप्टर केस वेळेत चालवल्या न गेल्याने आरोपी पुन्हा गुन्हे व त्रास देण्यास मोकाट सुटले आहेत. या सर्व प्रकाराला निवासी नायब तहसिलदार, महसुल नायब तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी हेच सर्वस्वी जबाबदार आहेत असा आरोप चिपकर यांनी केला आहे. या भोंगळ कारभारामुळे जनतेच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याला संपूर्णतः वेंगुर्ला तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार, महसुल नायब तहसिलदार हेच जबाबदार राहतील.
संबंधित लिपीक यांना कोणताही अधिकार नसताना पुढील सुनावणी तारीख देण्याचा आदेश कोणी दिला तसे असेल तर काय कारवाई होईल.
नैसर्गिक आपत्ती कामकाजात तर जाणुबुजुनच दिरंगाई केली जात आहे. तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत मात्र कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती करूनही ते उपस्थित राहत नाहीत.
नियंत्रण कक्षातील रजिस्टरमध्ये नुकसानीबाबत नोंद केली जात नाही. हे पाहण्याची जबाबदारी निवासी नायब तहसिलदार यांची असताना त्याच्याकडून दिरंगाई केली जात आहे.
त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील तहसील कार्यालयातील प्रशासकीय कारभार सुधारण्यासाठी तसेच जनतेला न्याय मिळण्यासाठी जबाबदार संबंधित निवासी नायब तहसिलदार, महसुल नायब तहसिलदार यांच्यावर तातडीने योग्य ती कारवाई केली जावी अन्यथा या विरोधात लवकरच उपोषण पुकारले जाईल असा इशारा राजाराम चिपकर यांनी दिला आहे.


