सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): लघु पाटबंधारे योजना कुंभवडे यांचा भूसंपादन प्रस्ताव क्र.12/2019 या प्रस्तवांमधील खातेदारांना मोबदला वाटप करण्यासाठी दिनांक 7 ते 10 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय कुंभवडे येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी सं.शिरोडकर यांनी दिली आहे.
तरी संबंधीत खातेदारांची यादी तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी यादीतील खातेदारांनी आवश्यक कागदपत्रांसह नमूद दिवशी मोबदला स्विकारण्यासाठी उपस्थित रहावे. मोबदलला वाटपाची कार्यवाही उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जिल्हा मुख्याल, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
रेशनकार्ड झेरॉक्स प्रत, खातेदारांचा 1 फोटो, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्सप्रत, रद्द झालेला धनादेश, बोजा विरहीत अद्यावत 7/12, जर 7/12 मध्ये इतर हक्कामध्ये बोजा असल्यास संबंधित संस्था,बँक यांचे रक्कम स्विकारण्यासाठी नाहरकत दाखला. खातेदार मयत असल्यास वारस हक्काचा पुरवा, खातेदार 18 वर्षाखालील असल्यास पालन पोषण करणाऱ्याचे नाव असलेले संबंधित सरपंचांचा दाखला. विवाहित महिला असल्यास नावात बदल असलेबाबतचा पुरावा म्हणून विवाहनोंदणी दाखला लग्नपत्रिका, महाराष्ट्र शासन राजपत्र.


