- संजय पिळणकर
वेंगुर्ला : नुकत्याच झालेल्या वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत ‘टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ कलाकृती बनवणे’ या स्पर्धेत इयत्ता सहावी ते दहावी या गटामध्ये श्लोक पुरुषोत्तम महाजन याने प्रथम क्रमांक मिळविला. त्याने कचऱ्यापासून म्हणजेच वेगवेगळ्या टाकाऊ वसतूपासून केदारनाथ मंदिराची एक भव्य कलाकृती तयार केली. त्याचबरोबर तेथील परिसर ही आकर्षक बनविला. लहान वयात कलाकृती बनवणारा तो वेंगुर्ल्यातील अवलिया ठरला.

यापुढेही असंच काहीतरी वेगवेगळ्या बनवण्याची त्याची मोठी इच्छा आहे. सध्या तो पाटकर हायस्कूल, वेंगुर्ले या शाळेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. त्याचे कौशल्य खरोखरच वाखाणण्याजोगे असून सर्व स्तरांतून श्लोकचे अभिनंदन होत आहे.


