सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग व सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी दुपारी 11 ते 1 वाजेपर्यंत श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी मोती तलावासमोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पिढीत वीज ग्राहकांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. वीज ग्राहकांनी वीज महावितरण मंडळाच्या संदर्भात तक्रारीच्या निवेदन सादर करण्यासाठी वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या झपाट्याने विकसित होणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे निर्मित होणाऱ्या अनेक वस्तू व सेवांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन बदलता राहणीमानामुळे आणि जीवनशैलीमुळे वीज आता सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. घर असो, की शिक्षण, शेती, उद्योग, व्यवसाय व नोकरी सर्व क्षेत्रात वीज हे आता अनिवार्य व अत्यावश्यक सेवा बनलेली आहे. आपल्या राष्ट्रीय वीज धोरणाप्रमाणे वीज समाजाच्या व आर्थिक विकासाचे प्रमुख हत्यार आहे.
वीज महावितरण महामंडळाच्या सेवा सुविधा उपकरणे साधनसामुग्रीचा अभाव तसेच अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वीज ग्राहक हैराण झाला आहे. त्याचाच अचानक आता जाहीर झालेले वीजदर वाढ ही ग्राहकांची डोकेदुखी झाली आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक अंदाजपत्रक कोलमडून पडले आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाकडून सर्वसामान्य ग्राहकांना अनुभवास येणारी उदासीनता, अनास्था आणि त्यातच शासनाचा खाजगीकरणाची वाटचालीचे धोरण लोकशाहीचे मूळ तत्वाला तिलांजली देण्याचा प्रयत्न त्यामुळे निर्माण होणारी मक्तेदारीचा परिणाम म्हणजे जनतेची लूट पिळवणूक फसवणूक टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी संघटित होऊन लढा देण्याचा प्रसंग आपल्यावर आता उडवलेला आहे.
स्पर्धा कार्यक्षमता आणि त्या आधारे सर्व ग्राहकांना 24 तास गुणवत्ता पूर्ण अखंडित वीज पुरवठा व ग्राहकांच्या हिताचे संरक्षण प्रमुख उद्दिष्टे ठेवून कायदा 2003 ची अमलात आणला आहे. सध्या महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर लावण्याची प्रयोजन आलेले आहे ते अमान्य असून वीज ग्राहकांच्या पूर्व परवानगीशिवाय स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर इलेक्ट्रॉनिक बसविण्यास सक्तविरोध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीज ग्राहक जनता दरबाराला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष वीज ग्राहक संघटना संजय लाड, उपाध्यक्ष गणेश बोर्डेकर, सचिव तुकाराम म्हापसेकर, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष संतोष तावडे, सचिव असलमत खतीब यांनी आवाहन केले आहे.
वीज ग्राहक संघटनेचा आज सावंतवाडीत जनता दरबार!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


