सावंतवाडी : भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी गणेशोत्सवाच्या पवित्र निमित्ताने गोव्याचे आमदार श्री जीत आरोलकर, यांच्या निवासस्थानी भेट दिली. आणि गणपती बाप्पाची भक्तिभावाने आराधना केली. या भेटीदरम्यान त्यांनी मित्रत्व, बंधुभाव, आणि सामाजिक एकतेचे महत्व अधोरेखित केले. गणेशोत्सव हा भारतातील सर्वाधिक साजरा केला जाणारा सण असून, तो केवळ धार्मिक उत्सव नसून, सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. या सणाद्वारे लोक एकत्र येऊन आपले वैयक्तिक मतभेद विसरून स्नेहभाव आणि आपुलकीने एकत्र येतात.
युवा नेते विशाल परब आणि आमदार जीत आरोलकर यांच्यातील या भेटीत, एकमेकांप्रती आदर आणि जिव्हाळ्याचा भाव प्रकर्षाने दिसून आला. गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना, त्यांनी सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. गणेशोत्सव हा सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणणारा सण असल्याने, यानिमित्ताने समाजातील विविध घटकांमध्ये संवाद आणि ऐक्याची भावना वाढीस लागते. परस्पर आदर, स्नेह, आणि सहकार्याचा संदेश देणाऱ्या या भेटीत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने समाजात एकात्मतेचा आदर्श प्रस्तुत, करण्याचा उद्देश परब यांनी व्यक्त केला.
त्यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित अँड अनिल निरवडेकर, बांदा माजी सरपंच अक्रम खान व मित्र परिवार आदी मान्यवर होते.


