काबूल : भारताविरोधात दहशतवादी कारवाई करणारा पाकिस्तान चांगलाच अडचणीत आलाय. शनिवारी रात्री पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर भयंकर स्थिती निर्माण झाली. हेच नाही तर तब्बल 12 पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठवण्यात आलेत. यासोबतच 5 सैनिकांना जिवंत पकडण्यात आले. अफगाण सैन्याने पाकिस्तानात घुसून सात वेगवेगळ्या भागात जड शस्त्रास्त्रांचा मारा केला. अफगाण सैन्याचा दावा आहे की या कारवाईत 12 पाकिस्तानी सैनिक मारले गेले, तर पाच जणांना पकडण्यात आले. पाकिस्तान-अफगाण सीमेवर सध्या तणावाचे वातावरण बघायला मिळतंय. पाकिस्तानी सैन्याची शस्त्रेही अफगाण सैन्याने जप्त केली आणि एका मृत सैनिकाचा मृतदेह त्यांच्या छावणीत नेला. या घटनेने एकच खळबळ उडाली. काही तास पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सीमेवर सुरू होता.
भारतीय वेळेनुसार काल रात्री 9.23 वाजता अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानला लागून असलेल्या 2,670 किमी लांबीच्या सीमेवरील एकूण 7 सीमेवर असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर एकाच वेळी हल्ला केला. या हल्ल्याला म्हणावे तसे उत्तर देण्यात पाकिस्तान समर्थ राहिला. अफगाणिस्तान सरकारने केलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेल्या 4 चाैक्यांवर त्यांनी ताबा मिळवला आहे. या हल्ल्याची काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कुनर-बाजौर सीमा, पक्तिया-कुर्रम सीमा, हेमलँड-बरमचा, बलुचिस्तान सीमा, नांगरहार-खैबर सीमा, फिरकी बोलदक-चमन बॉर्डर, खोस्त गुलाम खान-उत्तर वझिरीस्तान मीरानशाह सीमा आणि पक्तिका-दक्षिण वझिरीस्तान सीमा या ठिकाणी अफगाणिस्तान सैन्याने हल्ला चढवला. हेच नाही तर अफगाणिस्तान सरकारने हा हल्ला का केला यावर स्पष्टीकरणही दिले आहे.
अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानवरील हल्ला राजधानी काबूलवरील हवाई हल्ल्याचा बदला म्हणून केल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्याने वारंवार अफगाणिस्तानच्या पावित्र्याचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने पुन्हा अफगाण हवाई हद्दीचे उल्लंघन केले तर अफगाण सशस्त्र दल त्यांच्या हवाई हद्दीचे रक्षण करण्यास सज्ज आहे आणि अशाचप्रकारे प्रतिउत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र, इतक्या मोठ्या हल्ल्यानंतरही पाकिस्तानने यावर काही भाष्य केले नाहीये.


