सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदार यांनी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या केसचा नंबर मिळाला आहे. या याचिकेवर विचारविनिमय करण्यासाठी श्री. देव रवळनाथ मंदिर ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आज उत्साहात सभा संपन्न झाली .
दरम्यान हायकोर्टातील याचिकेतील गिरणी कामगार व वारसदारांना न्याय मिळवून देण्यासाठी मुद्दे –
1 गिरणी कामगार व वारसदार यांना मुंबईतच हक्काचे हक्काचे घर मिळावे.
2. गिरणींची जागा द्या, आम्ही आमच्या हक्काचे घर बांधतो.
3. गिरणी कामगार व वारसदार यांचे नुकसान भरपाई घराची किंमत म्हणून आम्हाला प्रत्येकी 7,16,0000/ रु. रक्कम द्यावी.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रता निश्चिती झालेल्या गिरणी कामगार व वारसदार यांना आवाहन करण्यात आले की आपल्याला न्यायालयीन लढ्यात सहभागी होण्यासाठी श्री. महादेव यशवंत सावंत, आवळेगाव सिंधुदुर्गनगरी यांच्या मोबाईल क्रमांक 7719874567 यावर संदेश पाठवा ग्रुपमध्ये सामील व्हा किंवा संपर्क साधावा.


