पुणे : महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियमात मोठा बदल केला असून, आता ही परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार, ‘पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीऐवजी इयत्ता चौथी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीऐवजी इयत्ता सातवीमध्ये घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.’ हा बदल शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होणार आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळेल, जिथे अनेक शाळा चौथी किंवा सातवीपर्यंतच आहेत. नवीन संरचनेनुसार पहिली परीक्षा फेब्रुवारी २०२६ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी आयोजित केली जाईल. या बदलासह, परीक्षेची नावे ‘प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा’ (इयत्ता चौथी स्तर) आणि ‘उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा’ (इयत्ता सातवी स्तर) अशी करण्यात येणार आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवीमध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे. यामुळे 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन (अंतिमतः) साधारणतः फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल.
चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन एप्रिल किंवा मे 2026 च्या कोणत्याही रविवारी –
तर इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे 2026 च्या कोणत्याही रविवारी करण्यात येईल. 2026-27 पासून पुढे इयत्ता चौथी इयत्ता सातवी मध्ये नियमितपणे शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. इयत्ता चौथीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये तर इयत्ता सातवीसाठी प्रतिवर्षी सात हजार पाचशे रुपये शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. इयत्ता चौथी व इयत्ता पाचवीकरिता प्रत्येकी 16,693 आणि इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवी करिता प्रत्येकी 16,588 शिष्यवृत्ती संच मंजूर राहतील.
शिष्यवृत्ती परीक्षेकरिता शासनमान्य शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देण्यास पात्र –
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेकरिता शासनमान्य (शासकीय/ अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देण्यास पात्र राहतील. सीबीएसई, आईसीएसई आणि इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच शासनमान्य शासकीय/ अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता चौथी किंवा इयत्ता सातवीत शिकत असावा. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे 1 जून रोजी कमाल वय 10 वर्षे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 14 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे वय 13 वर्षे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 17 वर्षांपेक्षा जास्त नसावे. दरम्यान, 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन (अंतिमतः) साधारणतः फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल. इयत्ता चौथीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये तर इयत्ता सातवीसाठी प्रतिवर्षी सात हजार पाचशे रुपये शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.


