Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

विधानसभेसाठी महायुतीतर्फे भाजप निम्म्या जागा लढवण्याचे संकेत.!

मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी महत्वाचे मानले जाणारे महायुतीच्या जागावाटपाचे सुत्र जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यानुसार, महायुतीमधील सर्वांत मोठा घटक पक्ष या नात्याने भाजप एकूण २८८ पैकी निम्म्या जागा म्हणजेच जवळपास १४० जागा लढवण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाट्याला ८० जागा येण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या वाट्याला सर्वांत कमी जागा म्हणजेच ६० पेक्षा कमी जागा येतील, असे वृत्त एका वाहिनीने महायुतीमधील सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

राज्यातील बहुप्रतीक्षित विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर अपेक्षित आहेत. त्या निवडणुकीचे वेळापत्रक या महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या प्रारंभी जाहीर केले जाऊ शकते. साहजिकच, राज्यातील राजकीय रणसंग्राम सुरू होण्यास फार अवधी उरलेला नाही. त्यामुळे महायुती आणि विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीच्या गोटांमध्ये आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची राज्यात पीछेहाट झाली. त्यामागे जागावाटप आणि उमेदवार निवडीतील विलंब हेही एक कारण असल्याचे मानले जाते. ती बाब विचारात घेऊन महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप लवकरात लवकर निश्‍चित करण्याची लगबग सुरू केली आहे. आता महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. लवकरच त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात येत आहे.

महायुतीमधील चर्चेनुसार भाजप १४० ते १५० यादरम्यान जागा लढवेल. त्याखालोखाल वाटा शिंदेसेनेला मिळेल. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गटाच्या तुलनेत शिंदेसेनेची कामगिरी उजवी ठरली. त्यामुळे शिंदेसेनेच्या वाट्याला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा येणार असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी झाल्याने अजित पवार गटाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. त्या गटानेही आग्रही भूमिका न घेता कमी जागांवर समाधान मानण्याचे धोरण अवलंबलेले दिसते. त्या गटाच्या वाट्याला ५५ च्या आसपास जागा येऊ शकतात. महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्ष, इतर छोट्या मित्रपक्षांनाही सामावून घेणार आहेत. त्या छोट्या पक्षांना किमान ३

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles