कुडाळ : निवती किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी ‘मराठा आरमार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मराठा आरमाराच्या पराक्रमास अभिवादन करण्यात आले.
२४ ऑक्टोबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग येथे मराठा आरमाराची स्थापना केली. त्या काळात परकीय सत्तांवर मात करून स्वराज्याचा झेंडा सागरावर फडकविण्याचे धाडस फक्त शिवाजी महाराजांनी दाखवले.
त्यांनी समुद्रसंपत्तीचे आणि सागरी सुरक्षेचे महत्त्व ओळखून भारताचे पहिले स्वतंत्र आरमार उभारले.
त्यामुळे हा दिवस दरवर्षी “मराठा आरमार दिन” म्हणून साजरा केला जातो.
या उपक्रमातून युवकांमध्ये इतिहासप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सागरसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण निवती किल्ला दुमदुमला.
या कार्यक्रमास हेमलता जाधव, सुहास सावंत, स्वप्निल साळसकर, विशाल परब, दत्तगुरु सावंत, समिल नाईक आणि गणेश नाईक आदी उपस्थित होते.
निवती किल्ल्यावर ‘मराठा आरमार दिन’ साजरा ! ; दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


