सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, आरोंदाच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदेश परब, उपाध्यक्ष बबनराव नाईक, सचिव भाई देऊलकर, खजिनदार रुपेश धर्णे, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा. सिद्धार्थ तांबे, ज्येष्ठ माजी विद्यार्थी डॉ. पी. वाय. नाईक, लेफ्टनंट कर्नल पद्माकर नाईक, बालरोगतज्ज्ञ डॉ. बळवंत केरकर, प्रा. नीलम धुरी, विद्याधर नाईक, बाळ आरोंदेकर, अशोक धर्णे, आबा केरकर, प्रशांत कोरगावकर, काका आचरेकर संस्थेचे सर्व पदाधिकारी विचारमंचावर उपस्थित होते. तर मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. शाम नाईक यांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा शाळेत राबविण्यात यावी व त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आपण देऊ, असे आश्वासन दिले. या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थी डॉ. बळवंत केरकर यांनी रोख रू. ५१,०००/- देणगी दिली. तसेच इतरही उपस्थितांनी प्रशालेस देणगी जाहीर केली.
संस्थेचे आधारस्तंभ व आरोंदा गावचे सुपुत्र डॉ. पी. वाय. नाईक यांनी वास्तु- नुतनीकरण निधी म्हणून २१ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. तसेच लेफ्टनंट कर्नल पद्माकर नाईक यांनीही आर्थिक योगदान देण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना आरोंदा गावचे सुपुत्र व मुंबई येथील प्रथितयश बालरोगतज्ञ डॉ. बळवंत केरकर यांनी आपले नेहमीच शाळेच्या विधायक कार्याला सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष व विस्तार इमारतीचे शिल्पकार आर. एस. नाईक यांचे सुपुत्र संजय नाईक यांनीही संस्थेला मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी उभा करून देण्याचे मुंबई पातळीवरून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आश्वासित केले. एकूणच हा स्नेह मेळावा संस्थेच्या भावी वाटचालीस उभारी देणारा ठरला . त्याबद्दल आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदेश परब व पदाधिकारी यांनी सर्व देणगीदार व संस्थेचे आधारस्तंभ असलेल्या माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केले.
ADVT –





