सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज मधील कंत्राटी भरती प्रचंड गोलमाल असून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निरढावलेले मेडिकल कॉलेजचे अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांची मागील महिनाभरापासून गळचेपी करत असल्याचे समोर आले आहे.शासनाकडून नियुक्त स्मार्ट
कंपनीकडून उमेदवारांची यादी येऊन महिनाभराचा कालावधी उलटला तरीही मेडिकल कॉलेजचे अधिकारी जिल्ह्यातील मुलांची कागदपत्र तपासणीसाठी तयार नाहीत यामागे नेमके कोणते गौडबंगाल आहे. अधिकारी व कर्मचारी तसेच कंपनीचे सुपर वायझर “पालकमंत्र्यांनी ही यादी थांबवायला सांगितली आहे” असे कारण देऊन वेळ मारून नेत आहेत. खरोखरच पालकमंत्री नितेश राणेंनी जिल्ह्यातील उमेदवारांना रुजू करून घेण्यास मज्जाव केला असेल तर ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. मात्र पालकमंत्र्यांनी खरोखरच नियुक्ती यांना मज्जाव केला आहे अगर कसे याचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा.प्रत्यक्षात आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मेडिकल कॉलेजचे काही कर्मचारी स्वतःच्या नातेवाईक व ओळखीच्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहेत. या संपूर्ण प्रकारामध्ये जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण-तरुणींचे खच्चीकरण होत असून लोकप्रतिनिधींनी डोळसपणे पाहणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील तरुण-तरुणींवर अन्याय झाल्यास मेडिकल कॉलेज समोर जन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक राजाराम उर्फ (आबा चिपकर) यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमधील कंत्राटी भरतीत गोलमाल? ; जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका संशयास्पद : युवा शिवसैनिक राजाराम चिपकर यांचा आरोप.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


