सावंतवाडी : तालुक्यातील ग्रामपंचायत माजगाव हददीतील गुलाबी तिठा मोरजकर घरामागील सर्व्हे नंबर 245, हिस्सा नं.5 9 व 10 नवीन इमारत बांधकाम लगत बेकादेशीर अनधिकृत संरक्षक भिंतही तात्काळ काढण्यासह माजगाव ग्रामपंचायत अधिकारी श्री परब यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईसह निलंबनाची कारवाई करणेबाबत आता गटविकास अधिकारी पंचायत समिती, सावंतवाडी यांनी माजगाव सरपंच यांना आदेश दिले आहेत.
माजगाव (म्हालटकरवाडी) येथील माहिती अधिकार पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुशिल रुपाजी चौगुले यांच्या दिनांक 01/08/2025 चा अर्ज विचारात घेऊन प्रशासनाने ही कारवाई करण्याचा आदेश दिलाय.

याबाबत सविस्तर पत्रात दिलेले आदेश असे की, मान. तहसीलदार यांचेकडील पत्र क्र. फौजदारी/कावि/सुशील चौगुले/तक्रार/7694/7/2025 दिनांक 13/08/2025, अर्जदार श्री सुशिल रुपाजी चौगुले रा. मु. पो. माजगाव (म्हालटकरवाडी) ता. सावंतवाडी यांनी ग्रामपंचायत माजगाव हददीतील गुलाबी तिठा मोरजकर घरामागील सव्र्व्हे नंबर 245, हिस्सा नं.5 9 व 10 नवीन इमारत बांधकाम लगत बेकादेशीर अनधिकृत संरक्षक भिंत ही तात्काळ काढण्यासह माजगाव ग्रामपंचायत अधिकारी श्री परब यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईसह निलंबनाची कारवाई करणेबाबत तसेच संदर्भ क्र 2 ने ग्रामपंचायत माजगाव हददीतील गुलाबी तिठा मोरजकर घरामागील सर्व्हे नंबर 245, हिस्सा नं.5, 9 व 10 नवीन इमारत बांधकाम लगत बेकादेशीर अनधिकृत संरक्षक भिंत ही तात्काळ काढण्याबाबत अशा आशयाचा अर्ज मा. तहसिल कार्यालयास सादर केलेला आहे.
प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने यापुर्वीच आपणास संदर्भ क्र 2 व 3 अन्वये अर्जदार यांच्या तकार अर्जामध्ये नमुट संदर्भ क्र.3,4 व 5 चे अर्जदार यांनी आपणास सदर प्रकरणी आवश्यक कार्यवाही करणेबाबत कळविणेत आलेले होते. परंतु आपण संदर्भ क्र.4 अन्वये दिलेल्या पत्रातील मजकुर मोघम स्वरुपात असलेचा प्रथमदर्शनी दिसून येते आहे.
सदर प्रकरणी पुनःश्च आपण मा. तहसिलदार यांचेकडील संदर्भ क्र.3 च्या पत्रात व संदर्भिय अर्जामध्ये नमुद केलेल्या सर्व बार्बीचे अवलोकन करन अधिनीयनातील तरतुद व वस्तुस्थीतीची खात्री करावी व ग्रामपंचायतीने अर्जदार श्री सुशिल रुपाजी चौगुले रा.मु.पो. माजगाव (म्हालटकरवाडी) याचे म्हणणे विचारात विश्वास्त घेवून त्यांचे समवेत प्रत्यक्ष ग्रामपंचायत येथे सुनावणी अथवा चर्चा करूनचं सदर प्रकरणी पुढील नियमोनुचीत कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा वस्तुनिष्ठ, स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल अर्जदारास सादर करावा. सदर प्रकरणी विलंब टाळावा,
सबब, सदर प्रकरणी अधिनीयमातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा वस्तुनिष्ठ, स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल तत्काळ या कार्यालयास सादर करावा, असे आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी श्री. वासूदेव नाईक यांनी दिले आहेत.


