- प्रा. रूपेश पाटील.
सावंतवाडी : अलीकडच्या काळात ‘हम दो हमारे दो, माँ-बाप को फेक दो.!’ ही विकृती वाढू लागली आहे. मात्र या विकृतीला शह देऊन समाजात आदर्श कुटुंब पद्धतीच्या संस्कृतीचं सुंदर उदाहरण घालून दिले ते आजगाव येथील मोरजकर कुटुंबीयांनी. तब्बल तीन डझनांपेक्षा अधिक सदस्य संख्या असलेल्या मोरजकर कुटुंबाने आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीला शह देत समाजापुढे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.
सध्या कोकणात गणपतीची धामधूम आहे. प्रत्येक चाकरमानी आपल्या गावी येऊन मोठ्या हर्षोल्हासात आपल्या लाडक्या बाप्पाचा सण साजरा करीत आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीने कोकणात गणपती सणाचा आनंद साजरा केला जातो. प्रत्येक घरातील बाहेरगावी असलेला कौटुंबिक सदस्य गणपतीला गावी येतो म्हणजे येतोच.
आजगाव येथील गुरुनाथ मोरजकर ऊर्फ वाटजी यांच्या कुटुंबाने तर समाजापुढे फार आगळ्यावेगळ्या पद्धतीचे उदाहरण ठेवलं आहे. तब्बल तीन डझन पेक्षा जास्त सदस्य असलेले सर्व लहान थोर मंडळी आजगाव येथे एकत्र येऊन मोठ्या गुण्या-गोविंदाने आपल्या लाडका बाप्पाला पुजतात. पुणे, कुडाळ, वास्को येथील मोरजकर कुटुंबीय एकत्र येऊन मोठ्या दिमाखात लाडक्या बाप्पाचा आनंद साजरा करतात. अलीकडच्या फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणाऱ्या लोकांना शहरात गावात गल्लीत काय चालले यापेक्षा आपल्या फ्लॅटच्या आजूबाजूला काय चालले आहे याची सुद्धा भनक नसते किंबहुना ते जाणून घेण्यात त्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो. मात्र मोरजकर कुटुंबीय एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखांचे साथीदार होतात. एकमेकांच्या लेकरा-बाळ्यांचे शिक्षण आणि त्यांची एकूण उपलब्धी याबाबत एकमेकांशी चर्चा करतात किंबहुना एकमेकांच्या मुला मुलींना शैक्षणिक गोष्टीसाठी मार्गदर्शन करून त्यांना मदतही करतात. अलीकडे तुझं तू बघ माझं मी बघतो असे वाक्य अनेकदा जागोजागी ऐकावयास मिळते. मात्र ‘चला सारे एकत्र येऊ, चला सारे प्रगती करू.!’ असा आपल्या जगण्यातून आदर्श पाठ मोरजकर कुटुंबातील सदस्यांनी घालून दिला आहे.

मोरजकर कुटुंबातील ८१ पार केलेले बाबुराव ऊर्फ दादा मोरजकर हे आजही आपले स्वास्थ्य व्यवस्थित टिकून शेतातील बागेतील सगळी कामे करतात. तर घरात आणि समाजात आपल्या वागण्याने ‘सबके साथ सबका विकास.!’ हा गुरु मंत्र देणारे मोरजकर कुटुंबातील दुसरे ज्येष्ठ बंधू गुरुनाथ मोरजकर ऊर्फ वाटजी हे कुटुंबातील सर्व सदस्यांसह समाजातील अनेकांना चांगली वाट दाखवून प्रगतीपथावर नेण्यासाठी अतोनात मेहनत करत आहेत. आजगाव पंचक्रोशीत त्यांचे स्वतःचे वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले आहे. समाजाकारण, राजकारण आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सल्ला अनेक लोकं घेत असतात. मोरजकर कुटुंबीयांचा सर्वात मोठा ‘आधारवड’ म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.
तसेच पुणे येथे स्थित असलेले बंधू शांताराम मोरजकर हे अतिशय सुसंस्कृत, संवेदनशील, संयमी आणि मितभाषी असून मोरजकर कुटुंबीयांना शैक्षणिक दिशा देण्यासाठी त्यांची नितांत गरज आहे. मोरजकर कुटुंबातील सर्व मुलं, सुना ह्या सुसंस्कृत असून प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात चांगल्या कर्तव्याचे पालन करीत आहेत. अमित मोरजकर हे व्यवसायाने इंजिनियर असून आजगाव येथील आपल्या मूळ कुटुंबाकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. रणजीत मोरजकर हे देखील उच्चशिक्षित असून ते देखील आपापल्या पद्धतीने आपल्या परिवाराला योग्य तो मार्ग दाखवतात. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ चिरंजीव जितेंद्र असून ते देखील स्वभावाने अतिशय शांत व प्रचंड कष्टाळू आहेत. किरण व चेतन हे दोन्ही बंधू अतिशय मेहनती असून डंपर व्यवसाय असेल किंवा शेती व शेतीपूरक. प्रत्येक जण आपापल्या व्यवसायात प्रामाणिकपणे कष्टाळूपणाने जीवन जगताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या कुटुंबातील सर्व सुना या सुशिक्षित असून त्या एकत्र गुण्यागोविंदाने आजपर्यंत कधीही भांडण किंवा कलह त्यांच्यात नाही, हे या कुटुंबाचे एक विशेष आहे.
मोरजकर कुटुंबातील सर्व नातवंडे आपल्या आजोबा आजी काका काकी या सगळ्यांना आपलेसे मानतात हे देखील आजच्या नव्या पिढीला एक सुंदर उदाहरण आहे. कारण अलीकडच्या मुलांना मम्मी पप्पा याव्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी गप्पा मारायला फारसा वेळ नसतो. मात्र येथील नातवंडे साऱ्या कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद साधतात हे आजच्या पिढीतील दुर्मिळ उदाहरण आहे. म्हणूनच मोरजकर कुटुंबाला सलाम करावासा वाटतो तो एवढ्यासाठीच.
”समाजातील इतरांनी देखील आपापसातील मतभेद दूर करून एकत्र येऊन आनंदाने एकमेकांच्या सुखदुःखांचे साथीदार व्हावे व गुण्या-गोविंदाने एकत्र नांदावे”, असा मौलिक सल्ला गुरुनाथ मोरजकर यांनी दिलाय.
असे आहे आजगावचे ‘मोरजकर’ कुटुंब –
आजगावस्थित –
श्री. बाबुराव ऊर्फ दादा नारायण मोरजकर (मोठे आजोबा)
सौ. पार्वती बाबुराव मोरजकर (मोठी आजी)
श्री. जितेंद्र बाबुराव मोरजकर (मुलगा)
सौ. ईशा जितेंद्र मोरजकर (सून)
ऐश्वर्या जितेंद्र मोरजकर(नात)
सानिका जितेंद्र मोरजकर(नात’)
श्री. गुरुनाथ नारायण मोरजकर (मधले आजोबा)
सौ. गीतांजली गुरुनाथ मोरजकर (मधली आजी)
किरण गुरुनाथ मोरजकर (मुलगा)
तनया किरण मोरजकर (सून)
आर्वी किरण मोरजकर (नात)
रुद्रांश किरण मोरजकर (नातू)
चेतन गुरुनाथ मोरजकर (मुलगा)
करुणा चेतन मोरजकर (सून)
मुंबईस्थित –
श्री. रणजित गुरुनाथ मोरजकर (मुलगा)
सौ. श्रावणी रणजित मोरजकर (सून)
स्वरा रणजित मोरजकर (नात)
वीरा रणजित मोरजकर (नात)
कुडाळस्थित –
कै.प्रभाकर नारायण मोरजकर (मधले आजोबा)
कै.प्रभावाती प्रभाकर मोरजकर (आजी)
कै.गोविंद प्रभाकर मोरजकर (मुलगा)
गंधाली गोविंद मोरजकर (सून)
साहिल गोविंद मोरजकर (नातू)
ओम गोविंद मोरजकर (नातू)
पुणेस्थित –
श्री. सखाराम नारायण मोरजकर (मधले आजोबा)
सौ. सुचिता सखाराम मोरजकर(आजी)
श्री. अमित सखाराम मोरजकर (मुलगा)
सौ. प्राची अमित मोरजकर (सून)
आर्ची अमित मोरजकर (नात)
आराध्या अमित मोरजकर (नात)
वास्को स्थित –
श्री. शांताराम नारायण मोरजकर (लहान आजोबा)
सौ. सीताबाई शांताराम मोरजकर (आजी)
श्री. नारायण शांताराम मोरजकर (मुलगा)
सौ. नम्रता नारायण मोरजकर (सून)
चि. शिवदेव शांताराम मोरजकर (मुलगा)
ADVT –





